28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाTeam India : जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर, मोठी बातमी आली समोर

Team India : जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर, मोठी बातमी आली समोर

आयसीसी टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सरावादरम्यान पाठदुखीची तक्रार त्याने केली होती.

आयसीसी टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी सरावादरम्यान पाठदुखीची तक्रार त्याने केली होती. यावेळी 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. आता या विश्वचषकात भारताला पुन्हा एकजदा आपला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय सहभागी व्हावे लागणार आहे. विशेष म्हणजे आशिया चषक 2022मध्ये सुद्धा जसप्रीत बुमराहला दुखापतीच्या कारणामुळे संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराहने पुनरागमन केले होते. मात्र, आता पुन्हा त्याच्या दुखापतीने तोंड वर काढले आहे.

बुधवारी (28 सप्टेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तो खेळू शकला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आता बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बोर्डावरील त्याच्या दुखापतीबाबत बुधवारी सांगण्यात आले की, वैद्यकीय पथक त्यावर लक्ष ठेवून आहे. एक दिवस त्याच्या विश्वचषकातून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे.

इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो पुनर्वसनात होता आणि आशिया कपमध्येही खेळला नाही. त्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या टी20 मालिकेत दुखापतीतून त्याने पुनरागमन केले. या मालिकेत तो फक्त दोनच सामने खेळू शकला. पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती दिली असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ज्या सामन्यात बुमराह संघात नव्हता तो सामना भारताला गमवावा लागला होता. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत विजय मिळवला होता. आता मात्र, बुमराह थेट विश्वच,कातून बाहेर गेल्याने संघाचे टेन्श वाढले आहे.

दरम्यान, आता जसप्रीत बुमराह संघातून बाहेर गेल्यानंतर कोणत्या खेळाडूची टी20 विश्वचषक संघात वर्णी लागते हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे. यावेळी टी20 विश्वचषकातील संघात राखीव खेळाडू म्हणून दीपक चाहर आणि मोहम्मद शामी या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात बुमराहच्या अनुपस्थितीत उमेश यादवला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता संघात शामीच्या ऐवजी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी