28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबई‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’

‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’

‘मी बुद्धिस्ट फौंडेशन’ प्रकाशित तसेच ॲड विश्वास काश्यप आणि संदीप सारंग संपादित ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ या आगामी महाग्रंथाच्या संपादकियामधील एक छोटासा परिच्छेद.

‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’

चैत्यभूमी….! आपली चैत्यभूमी….! तमाम भारतीयांची चैत्यभूमी….! भारताच्याच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या मुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या महामानवाचे चिर विश्रांतीस्थान असलेली चैत्यभूमी…! भारतीयांच्या तनामनात अपरंपार चैतन्य निर्माण करणारी चैत्यभूमी ….! मानवी अधिकारांच्या प्रस्थापनेसाठी संघर्षरत करणारी चैत्यभूमी….! माणसाला माणूस मानण्याचा शाश्वत संदेश देणारी चैत्यभूमी …! करोडो शोषितांच्या जगण्यात आश्वासक श्वास फुंकणारी चैत्यभूमी…! अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची विजीगिशु उर्मी पेरणारी चैत्यभूमी…! माणुसकीच्या शोधात निघालेल्या जीवांना अनामिक ओढीने खेचून आणणारी चैत्यभूमी…! स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची वैश्विक दिशा देणारी चैत्यभूमी…! न्यायाचा गगनभेदी पुकारा करणारी चैत्यभूमी…! मनुष्यमात्राच्या उत्थानासाठी सर्वशक्तीनिशी प्रस्थान ठेवणारी चैत्यभूमी …! पेशींपेशींमध्ये पावित्र्याची , उदात्ततेची, मांगल्याची टवटवीत फुलं फुलविणारी चैत्यभूमी…! रक्ताच्या थेंबाथेंबात अस्मितेचा जाज्वल्यभाव जागविणारी चैत्यभूमी…! गलितगात्र शरीरात हजार हत्तींची ऊर्जा ओतणारी चैत्यभूमी …! आयुष्यभर पुरेल असे जिंदादिल आत्मबळ पुरविणारी चैत्यभूमी…! तिमिरातून तेजाकडे झेपावण्यास प्रवृत्त करणारी चैत्यभूमी …! पिढ्यांपिढ्यांच्या अंधारातून युगानुयुगांच्या प्रकाशाकडे नेणारी चैत्यभूमी …! ६ डिसेंबरला जमणारा अथांग जनसागर पाहून अथांग महासागरालासुद्धा जिचा कायम हेवा वाटत आला ती चैत्यभूमी…! उज्ज्वल उद्यासाठी आज अखंडपणे तेवत राहणारी चैत्यभूमी…! अशी तू  प्रेरणाभूमी …..चेतनाभूमी…..चैत्यभूमी….!   हे प्रिय चैत्यभूमी….. तू आहेस म्हणून मी आहे…..आम्ही आहोत ….!

‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’ ‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’

नमूद महाग्रंथ लवकरच आपल्या भेटीस येत आहे.

आपलाच,

ॲड. विश्वास काश्यप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी