29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांनी सांगितली, डॉ. बाबासाहेब, अन् शाहू महाराजांची आठवण !

जितेंद्र आव्हाडांनी सांगितली, डॉ. बाबासाहेब, अन् शाहू महाराजांची आठवण !

टीम लय भारी 

मुंबई: आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा असणारे छत्रपत्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. माणगाव परिषदेमुळे दलित समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिषदेविषयी काही आठवणी सांगितल्या आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे.

आव्हाडांनी म्हटलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील माणगाव येथे अस्पृशांची परिषद झाली. या परिषदेच्या सभेस सुमारे ५,००० लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या दोन महामानावांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते ते आपल्याला इतिहासात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.माणगाव येथील परिषदेत पहिल्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात बोलत असतांना, इथल्या अस्पृशांच्या राजकीय, सामाजिक, गुलामगिरीला,त्यांच्या दुःखाला इथल्या मनुवादी व्यवस्था जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी मिळून त्या विरोधात बंड पुकारून आवाज उठवण्याचे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

तर त्याच परिषेदेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या भाषणात, कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, महार वतन आणि ब्राह्मणी कुलकर्णी वतनाची जुलुमी प्रथा नष्ट करणे, सर्वच जातींतील लोकांना, तलाठी, वकील म्हणून काम करण्याची संधी मिळने, असे अनेक महत्वपूर्ण निर्णय शाहू महाराजांनी घेऊन एका प्रकारे अस्पृशांना न्याय देण्याचे काम केले.

राजर्षी शाहू महाराज परिषदेतील लोकांना संबोधित असतांना म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपात, तुमचा खरा पुढारी तुम्ही हिरा निवडला आहे, त्या बद्दल अभिनंदन. पुढे म्हणाले माझी खात्री आहे की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नाही तर एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्तानाचे पुढारी होतील अशी माझी मनू देवता मला सांगते.”

मानगाव परिषदेमुळे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नवी जोडी महाराष्ट्राच्या सामाजिक शिक्षितजावर निर्माण झाली आणि यानिमित्ताने स्पृश्य जातीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळायला लागले. त्यांना मानसन्माची वागणूक मिळायला लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच यापुढे देशातील अस्पृश्य दलित वर्गाचे नेतृत्व करतील अशी ऐतिहासिक घोषणा याच माणगावच्या परिषदेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केली. आजच्या या ऐतिहासिक दिनानिमित्त, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी