30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटींचा हृदयविकाराने मृत्यू !

पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटींचा हृदयविकाराने मृत्यू !

मुंबई : पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. पंजाब-महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसमोर निदर्शने करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. यामुळे इतर खातेदारांमध्ये भीती पसरली आहे.

संजय गुलाटी (५१) असं या खातेदाराचं नाव आहे. संजय यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत त्यांचे खाते होते. बँकेवरील निर्बंधांमुळे त्यांचे ९० लाख रुपये अडकले होते. सोमवारी दुपारी खातेदारांनी तारापोर गार्डन परिसरातील बँकेच्या शाखेसमोर निदर्शने करण्याचे ठरवले होते. आपल्या पैशाचेही काहीतरी होईल, या आशेने गुलाटी देखील त्यात सहभागी झाले होते.

काही वेळ निदर्शने केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले. संजय गुलाटी सुद्धा साडेतीनच्या सुमारास घरी आले आणि झोपले. पावणे पाचच्या सुमारास त्यांनी पत्नीकडे काहीतरी खायला देण्यास सांगितलं. ते खात असतानाच ते कोसळले. घाबरलेल्या त्यांच्या पत्नीने सोसायटीचे सचिव यतींद्र पाल यांना फोन केला. त्यांनी तातडीने धाव घेऊन संजय यांना कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संजय गुलाटी जेट एअरवेजचे माजी कर्मचारी 

‘संजय आणि त्यांचे वडील दोघेही जेट एअरवेजचे माजी कर्मचारी होते. संजय यांची जेटमधील नोकरी गेली होती. पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे त्यांची बचतही अडकली. त्यांना कुठलाही मोठा आजार नव्हता, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी माध्यमांना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी