26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमुंबईलय भारी! मीडिया खरेदी करण्याचे मनसुबे?

लय भारी! मीडिया खरेदी करण्याचे मनसुबे?

राजेश सावंत

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे बळी जात आहेत. बीकेसी कोविड रुग्णालयात (BKC Covid Hospital) सावळागोंधळ सुरू आहे. त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत. या कोविड सेंटर मधील भ्रष्टाचाराची चौकशी सुद्धा प्रलंबित आहे.

तिथे योग्य प्रमाणात आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने योग्य उपचाराअभावी रुग्णांचे नाहक बळी जाताहेत. येथे मृत्यू होतो कोणाचा आणि त्यावर अंतिम संस्कार करतो कोण? कोणाचे पायपोस कोणालाही उरलेले नाही, असा संतापजनक हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा येथे सुरू आहे. तेच बीकेसी कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश डेरे आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे आता नेस्को कोविड सेंटरची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. ते इथेही लोकांच्या जीवाशी खेळणार! पण याचा जाब त्यांना कोण विचारणार?

संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून वेळ मागत असून मोदींनी का दिली नाही?; उद्धव ठाकरेंचा सवाल

रेमडिसीवर आणि टॉसिलीझुमाब इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्बंध

More Indian children are getting infected with coronavirus in the second wave

बीकेसी कोविड सेंटरमधील (BKC Covid Center) सावळागोंधळ अनेकदा उघडकीस आला. इंग्रजी, हिंदी, मराठी वृत्तपत्रात त्याबाबत बातम्या छापून आल्या. चॅनेलवरही यांच्या मिसमॅनेजमेंटचे वृत्त झळकले. सोशल मीडियावरही चौफेर टीका सुरू आहे. त्यामुळे सैरभैर झालेले डीन डॉ. राजेश डेरे हे स्वतःची डॅमेज झालेली इमेज सुधारण्यासाठी आता मीडिया खरेदीचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे त्यासाठीही ते या कोविड सेंटरमधील रुग्णांना देण्यासाठी बीएमसीने दिलेली औषधे गरजू रुग्णांना न देता ती औषधे किट्सच्या माध्यमातून मीडिया मधील काही पत्रकारांना हाताशी धरून ते तळागाळातील पत्रकारांना औषधांचे किट्स मोफत वाटप करून त्यांना खुष करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे बीकेसीसह आता नेस्को कोविड सेंटरची जबाबदारी सोपवलेली असताना आणि कोविड पेशंट वाढत असतानाही डॉ. डेरे येथील रुग्णांना राम भरोसे सोडून किट्स वाटपासाठी स्वतः वेळात वेळ काढून जातात. हे मोफत किट्स देऊन डॉ. डेरे हे मीडिया खरेदी करण्याचे मनसुबे तर रचत नाही ना, असा प्रश्न पडला आहे.

परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की या कोरोना महामारीत अनेक पत्रकार बांधव, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही योग्य उपचाराअभावी तडफडून मेले. अनेकजण आजही योग्य उपचार मिळावेत यासाठी धडपडत आहेत. आजतक चॅनेलचे निवेदक पत्रकार रोहित सरदाना यांचा मृत्यू झाला. त्यांची तर एक व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे.

बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय… भाजप नगरसेवकाचा आंदोलनाचा इशारा!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2813215659008558&id=100009604552057

अशाप्रकारे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत बळी गेलेल्या व मृत्युशी संघर्ष करत असलेल्या लोकांना आधार देण्याऐवजी, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात पेटून उठण्याऐवजी आमचेच पत्रकार बंधू त्यांच्या कोविड सेंटरमध्ये तेथील गरजू पेशंटला देण्यासाठी आणलेले औषधांचे किट्स त्या रूग्णांना देण्याऐवजी ते कीट्स या रुग्णालयाचे डीन स्वतः च्या प्रसिद्धीसाठी पत्रकारांना देऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यांचे ते कृत्य पाहून खरेच आपण इतक्या खालच्या स्तरावर पोहचलो, याची घृणा वाटते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी