30 C
Mumbai
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रपत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला बेड्या

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला बेड्या

लय़भारी न्यूज नेटवर्क

बेंगळुरू : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या.

ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी असलेला ऋषिकेश देवडीकर धनबादमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती एसआयटीला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून ऋषिकेशच्या मुसक्या आवळल्या.

कतरासमधील व्यापारी प्रदीप खेमका यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर ऋषिकेश काम करत होता. त्याने आपली ओळख लपवली होती. वेगळ्याच नावाने तो तिथे वावरत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवले. ऋषिकेश जिथे वास्तव्याला होता त्या घराची झडती घेतली जात असून त्यात काही महत्त्वपूर्ण दस्तावेज व माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

ऋषिकेशला आज धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, प्रसिद्ध कवी आणि पत्रकार पी. लंकेश यांच्या कन्या गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरूत हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाइंड ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंड मधल्या धनबाद येथून अटक करण्यात आली आहे. कर्नाटक एसआयटीने ही कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो धनबाद मधल्या कतराजमध्ये वास्तव्य करत होता. पण तो मूळचा महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादचा आहे.

१९६२ मध्ये जन्मलेल्या गौरी या लंकेश पत्रिकेच्या संपादक होत्या. नक्षल समर्थक आणि हिंदू विरोधी अशी प्रतिमा त्यांची तयार करण्यात आली होती. काही काळ त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांमध्येही नोकरी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या आणि धडाडीच्या पत्रकार अशी गौरी लंकेश यांची ओळख होती, आता त्यांच्या हत्येचा मास्टर माईंड ऋषिकेश जेरबंद झाला असला तरी विचारवंतांना संपवणारी ही मानसिकता कधी संपणार हा खरा प्रश्न आहे. विचारवंतांच्या हत्या करून विचार संपत नाहीत त्यामुळे या चारही विचारवंतांवर जरी गोळ्या झाडल्या असल्या तरी त्यांचे विचार समाज जोपासत राहील यात मात्र शंका नाही.

कोन आहे मारेकरी देवडीकर….

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषिकेश देवडीकर हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादचा आहे. औरंगाबादेत ऋषिकेश याचे पतंजलीचे दुकान होते. शहरातील एन-९ सिडको भागात तो दुकान चालवायचा. आई, वडील, पत्नी आणि मुलीसह तो वास्तव्य करत होता. ऋषिकेश याने जगदीश कुलकर्णी यांचे दुकान भाड्याने घेतली होते. मात्र, २०१६ मध्ये ऋषिकेश याने साहित्यासह दुकान सोडले होते अशी माहिती दुकान मालक जगदीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी