31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईसाकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला अखेर फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला अखेर फाशीची शिक्षा

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात गेल्यावर्षी झालेल्या बलात्कार (Sakinaka rape case)आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या ताब्यात घेतले होते.(Sakinaka rape murder case)

त्यानंतर अवघ्या 18 दिवसांत आपला तपास पूर्ण करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणाच्या सुनावणीत दिंडोशी कोर्टाने आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवलं. कोर्टाने दोषी ठरवल्यावर अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ हे प्रकरण असल्याचं सांगत राज्य सरकारकडून आरोपीला फाशीची शिक्षा (Sakinaka rape case) देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली.

या प्रकरणी कोर्ट आज आपला फैसला सुनावणार आहे. दुपारच्या सत्रात कोर्टने (Sakinaka rape case) निकाल जाहीर केला. दुपारी 2:45 वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होणार होऊन दोषी मोहन चौहान पोलीस बंदोबस्तात कोर्टात उपस्थित. व आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय दिला.

नेमकं काय घडले ?

मुंबईत गेल्या वर्षी एका महिलेवर बलात्कार (Sakinaka rape case) करुन तिची हत्या केली होती. बलात्काराची घटना अमानवीय होती. आरोपीने बलात्कारानंतर तरुणीची हत्या केली आणि तिच्या गुप्त भागावर रॉड घुसवला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्या तरुणीचा उपाचादारम्यान मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा :- 

Sakinaka rape & murder case: Mumbai sessions court sentences 45-year-old man to death

मोदी सरकारच्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपाची मोहीम

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी