32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईसंदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी

संदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी

लोकांशी थेट नाते असणारे मंत्री मंडळातील अनेक मंत्री आहेत. त्यात रोहयो, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांचा पहिला क्रमांक लागतो. अशा या भुमरे यांचा कामाचा धडाका आणि लोकसंग्रह दांडगा आहे. त्यामुळे पैठण या विधानसभा मतदारसंघातून ते पाचव्यांदा आमदार झालेले आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपली मुळे विसरली नाही पाहिजे. भुमरे हे आज एक महत्वाच्या खात्याचे मंत्री असूनही त्यांनी आपल्या राहणीमानात बदल तर केला नाहीच, शिवाय समोर जे काही जेवण वाढलेले असेल ते आनंदाने खातात. १ मार्च २०२३ रोजी ते काही कामानिमित्त विमानाने प्रवास करत असताना भूक लागली आणि एका डब्यात असलेली भाकरी भाजी मनात कोणताही किंतु न बाळगता खाल्ली. त्यांचा तेव्हाचा विमानात भाकरी खातानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

भुमरे यांच्या मतदार संघात तब्बल २५० गावे येतात. या गावातील प्रत्येक व्यक्तीचे ते काम तर करतातच, शिवाय एखादी विरोधी पक्षाची व्यक्ती काही कामे घेऊन आल्यास त्याचेही काम ते  हसत हसत  करतात. भुमरे हे पैठणचे असल्याने आठवड्यातील मंगळवार, बुधवार ते मुंबईत असतात. नंतरचे दिवस ते मतदार संघ आणि ग्रामीण भागासाठी देत असतात. दर सोमवार हा मतदार संघातील नागरिकांसाठी असतो. यात लोकांशी भेटीगाठी, त्यांच्या समस्या यावर चर्चा होते. शिवाय मतदार संघातील विविध विकासकामे कशी तातडीने मार्गी लागतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, असेच काहीसे भुमरे यांचे आहे. ते राज्यातील कुठल्याही दौऱ्यावर असले तरी त्यांचे लक्ष मतदार संघावर असते. आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावची ते तालुक्याच्या ठिकाणी ३ महिन्याने बैठक घेतात. यात महसूल, कृषि आदी विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतात. यावेळी विकास कामांचा आढावा घेतला जातो. झालेली कामे याची माहिती घेतली जाते. प्रलंबित कामांची यादी तयार करण्यात येते. तीन महिन्याने त्यावर कामे सुरू होतात.

भुमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन अशी थेट सामान्य जनतेशी संबंधित खाती आहेत. एकेकाळी रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असे, पण भुमरे या खात्याचे मंत्री झाल्यावर त्यांनी ते रोखले. शिवाय लाभार्थीच्या खात्यात रक्कम कशी तातडीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच की काय आजघडीला राज्यातील मुजुरांच्या हाताला कामे आहेत, शिवाय त्याचा मोबदलाही त्यांना योग्य पद्धतीने मिळत आहे.

फलोत्पादन हे शेतीशी संबंधित खाते. पण भुमरे यांनी या खात्यात चांगले काम केले आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात हजारो लाभार्थी मंडळींना लाभ मिळवून दिलेला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील लाभार्थीना सामुहिक शेततळे तयार करून दिलेली आहेत. यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाभार्थी आवश्यक असतात. आकारमानानुसार फलोत्पादन क्षेत्र ०.५  हेक्टर. ते १०.००  हेक्टर त्यापैकी ५०  टक्के फळबाग आवश्यक असते. असे निकष आहेत. हरितगृह /शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला/ फुलपिके लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान दिलेले आहे.

हे सुद्धा वाचा
तुम्ही २ हजारांच्या नोटा केव्हा बदलणार? उरलेत केवळ ४८ तास
आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच? विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर
भारतीय शेतकऱ्यांचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन

रायपनींग चेंबर अर्थात पिकवणगृहामध्ये (Ripening chamber) इथिलीन सारख्या नैसर्गिक सम्प्रेरकाचा (natural hormone) वापर करुन केळी, आंबा, पपई इ.फळपीकांना गरजे नुसार पिकवता येते. फळांतील रस, गर साल इ. एकसंध  पिकत असल्यामुळे फळांचा टिकाऊपणा वाढतो. फळांच्या वजनामध्ये कमीत कमी घट आणि फळांची गोडी, चव व आकर्षकपणा वाढतो.

राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था/कंपन्यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. असे यासाठी निकष असून ते पूर्ण केलेल्याना रायपनींग चेंबर उभारणीसाठी ३५% अनुदान मिळते. हे अनुदान मिळवून देण्यासाठी भुमरे आग्रही असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी