32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणदीपक केसरकरांची अनोखी गणेश भक्ती; रात्रभर मुंबईत, दिवसा कोकणात!

दीपक केसरकरांची अनोखी गणेश भक्ती; रात्रभर मुंबईत, दिवसा कोकणात!

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची गणेश भक्ती अनोखी असून ते रात्रभर मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देऊन सकाळी पुन्हा कोकणात जात दिवसभर ते कोकणात राहतात. पुन्हा मुंबईला परत येतात. केसरकर यांच्या या अनोख्या भक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. शालेय शिक्षण हे खाते तसे संवेदनशील पण केसरकर ते खातेही लीलया सांभाळत असून तशाच प्रकारे गावचे गणपती आणि मुंबईतील कार्यकर्त्यांच्या गणपती उत्सवाना भेटी देत आहेत. गणपतिविषयी असलेली श्रद्धा आणि कार्यकर्ते यांच्या प्रेमापोटीच केसरकर गणेशोत्सवात कसरत करत आहेत.

केसरकर हे मूळचे कोकणातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. गणपती आणि कोंकणी माणूस हे एक अतूट नाते आहे. सामान्यातला सामान्य माणूस अडचणीवर मात करत कोकणात या उत्सवासाठी जात असतो. केसरकरही दरवर्षी भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. केसरकर यांनी मंगळवारी दिवसभर मुंबईतील खासगी आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या. रात्री उशिरापर्यंत हा गणेश दर्शन कार्यक्रम सुरू होता तो रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर ते सकाळी विमानाने गोव्याला गेले. तिथून सिंधुदुर्ग येथील गणेश दर्शन घेतले त्यानंतर ते सावंतवाडी, दोडामार्गे कोल्हापूरला गेले. तिथे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा रात्री मुंबईत पोहचले. मुंबई असो वा गावचे मंडळ लोक प्रमाणे बोलवत असल्याने त्यांचा आग्रह ते कधीही मोडत नाही. प्रत्येक मंडळाला धावती का होईना ते भेट देत असतात. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा हा नित्यक्रम आहे.

आपल्याला एखाद्या दिवशी प्रवास घडल्यावर अंगात आळस संचारतो. दुसऱ्या दिवशी कामाला काही जात नाही. पुन्हा फ्रेश झाल्यावर कामाला जातो. पण केसरकर हे गणेशोत्सवात मुंबई, कोकण दौरा करत असताना थकत का नाही, हा त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो. एखादी जबाबदारी पक्षाने अंगावर टाकल्यावर त्याला न्याय देण्याचे काम केसरकर करतात, त्यामुळेच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुड बुक मध्ये असणाऱ्या अनेक मंत्र्यात केसरकर अग्रेसर आहेत.

शालेय शिक्षण हे खाते तसे संवेदनशील. त्यामुळे अनेकांना हे खाते नको असते. पण केसरकर यांना हे खाते मिळाल्यापासून त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन समाजातील सगळ्याच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. केसरकर हे व्यक्तिमत्व फार मवाळ आहे. ते विरोधकांची टीकाही सहजतेने घेतात. त्यात कुठलाही त्वेष नसतो. त्यामुळेच की काय विरोधी पक्षातील अनेकांशी त्यांचे चांगलेच पटते. शिंदे गटातील एक सुसंस्कृत मंत्री म्हणून केसरकर यांच्याकडे पहिले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी