26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबईमुंबईतील शाळा बंदच राहणार?

मुंबईतील शाळा बंदच राहणार?

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा (School) विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपासून पुढील आदेशपर्यंत बंदच ठेवाव्यात अशी सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्याचवेळी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवले. राज्यातील बहुतांशी सर्व जिल्ह्य़ांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने १५ जानेवारीपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा १६ तारखेपासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याची सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरीही अन्य देशांमध्ये करोनाची आलेली दुसरी लाट व अन्य राज्यांतील करोनाची परिस्थिती लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा व विद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिके च्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

सोमवारपासून शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम

मुंबई पालिकेच्या क्षेत्रातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांकडे पाठवला होता. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीही सुरू झाली होती. शाळांची स्वच्छता, र्निजतुकीकरण तसेच शाळांना तापनाममापक, प्राणवायूमापक, साबण उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

तयारी किती वेळा?

सुरुवातीला २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला तेव्हा शिक्षकांना चाचण्या करून घेण्याचा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शिक्षकांनी चाचण्या केल्या, शाळांनी तयारीही केली. नंतर पालिकेने ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याची सूचना दिली. ४ जानेवारीपासून शाळा सुरू होण्याच्या अपेक्षेने पुन्हा एकदा शाळांनी तयारी सुरू केली. आता पालिकेच्या निर्णयामुळे चाचण्या करायच्या की नाही, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. काही शिक्षकांनी आतापर्यंत तीनदा चाचण्या केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी