29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईUddhav Thackeray : तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?-उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?-उद्धव ठाकरे

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही. मात्र विरोधी पक्षामध्येच विरोधी हा शब्द आहे त्यामुळे त्यांना त्या शब्दाला जागावं लागतं. राज्यावर अनेक नैसर्गिक संकटं आली. सरकारचे ८ महिने कोरोना संकटात गेले. राज्यात अनेक संकटं आली पण विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडेल? किंवा सरकार कधी पडणार? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामं केली त्याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्यात विषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कोरोना संकट असेल, निसर्ग वादळ असेल, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटं राज्यावर आली तरीही त्यातून हे सरकार मार्ग काढतं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण देत असताना किंवा कोणतंही आरक्षण देत असताना कुणाचेही हक्क मारले जाणार नाही. कुणाचंही आरक्षण काढून कुणालाही दिलं जाणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न येईल तेव्हा त्यांचे हक्क कुणीही हिरावून घेणार नाही. हा काहीही कारण नसताना उगाचच विरोधकांनी मुद्दा केला आहे.

कोरोना काळात महाराष्ट्रात प्रचंड भ्रष्टाचार झाला हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात जे काही घडलं त्यातून आपण मार्ग काढत आहोत मात्र विरोधकांनी या सगळ्या काळातही फक्त राजकारण केलं. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे २८ हजार कोटी येणं बाकी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी