27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईमुख्यमंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री; तरीही ठाण्यात वाहतूक कोंडी

मुख्यमंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री; तरीही ठाण्यात वाहतूक कोंडी

ठाणे जिल्हा वाहतूक कोंडीच्या मगरमिठीतून सुटायचे काही नाव घेत नाही. एक मुख्यमंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक कॅबिनेटमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात घोडबंदरपासून कळवा-दिवा-मानकोली ते कल्याण बायपासपर्यंत दररोज वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहे. रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्डे पाहून आपण चंद्रावर तर नाही ना, असे वाटते. या अनेक रस्त्यांवर ठाण्याहून इतरत्र जाण्यासाठी साडेतीन तास लागतात. मोठ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. यात खऱ्या अर्थाने भरडले जात आहेत शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कामानिमित्त वाहने घेऊन बाहेर पडलेले कामगार यांची या वाहतूक कोंडीत दररोज दमछाक होत आहे.

एकनाथ शिदे हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात नगरविकास आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचे या वाहतूक कोंडीकडे लक्ष होते. पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून या ‘छोट्या’ समस्येकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. त्याचा गैरफायदा सरकारी बाबू उचलत आहे. ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पट्ट्यात मोठमोठी गोदामे आहेत. तीच खऱ्या अर्थाने जिल्ह्याची वाहतूक कोंडतात. केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील ज्या दिवे गावात राहतात तिथला कल्याणकडे जाणारा रस्ता कायम वाहतूक कोंडीशी झुंजत असतो. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे. राज्याचे दोन मंत्री आणि केंद्रातील एक मंत्री जिल्ह्यात असतानाही वाहतूक कोंडी सुटत नसेल तर काय करायचे असा सवाल जिल्हावासी करत आहे.

कळव्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास;
वाहतूक कोंडीत अडकला जुना मुंबई-पुणे रस्ता
एकीकडे ठाण्यातील रस्ते सोयीस्कर व्हावेत म्हणून ठामपा आयुक्त आणि वाहतूक पोलीस छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये रस्ता दुभाजक टाकताहेत तर कुठे वळणवाटाच बंद केल्या जाताहेत. मात्र दुसरीकडे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सह्याद्रीजवळ असलेल्या एसव्हीपीएम शाळेच्या दारात असलेल्या वाहतुक कोंडीने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याने पालकांनी या रस्त्यावर ट्रॅफीक वॉर्डन नेमण्याची मागणी वाहतूक शाखेकडे केली आहे. तर शाळा प्रशासनाकडून पालकांना आत प्रवेश करण्यास गेट बंद केल्याने पालकांना रस्त्यावर आपल्या पाल्यांची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पसंती; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती

डोळे हे जुल्मी गडे…. अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

नाशिकच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन  

2005 साली कळवा नाक्यावर एका भीषण अपघात घडला होता. बेलापूरकडून येणार्‍या भरधाव ट्रकने एका शाळकरी मुलाला चिरडले होते. त्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. ती घटना आठवण्याचे कारण म्हणजे ठाण्याच्या कळव्यातील जुन्या मुंबई – पुणे रोडवर सह्याद्री येथे एसव्हीपीएम शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या या रस्त्यावर जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मुंब्य्राकडे जाणारी व ठाण्याकडे येणार्‍या वाहनांमधून वाट काढत विद्यार्थी रस्ता ओलांडतात. नेमके दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेतील मेन गेटवर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच मराठी मिडीयमची दुपारी शाळा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची गर्दीसुद्धा एकाच वेळी होते पूर्वी शाळा प्रशासनाकडून पालकांना शाळेच्या आतील आवारामध्ये प्रवेश होता.

परंतु गेल्या दोन वर्षापासून शाळा प्रशासनाकडून गेट बंद करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणारे रिक्षाचालक टू व्हीलर स्कूल बस रस्त्याच्या बाजूला गाड्या पार्किंग करतात शाळा सुटल्यानंतर पालकांची व विद्यार्थ्यांची तारांबळ होते. शाळा प्रशासनाकडून ट्रॅफिक वॉर्डन किंवा पोलिसांची नेमणूक वाहतूक शाखेने केल्यास पालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होवू शकते, असे पालकांकडून सांगण्यात येते. दरम्यान, भविष्यामध्ये एखादा मोठा अपघात झाल्यास शाळा प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का, असा सवालही पालकांकडून केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी