30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईcorona : 'कोरोना'चा विषाणू किमान 10 वर्ष तरी जाणार नाही; BioNTech चे...

corona : ‘कोरोना’चा विषाणू किमान 10 वर्ष तरी जाणार नाही; BioNTech चे CEO साहिन यांची माहिती

टिम लय भारी

मुंबई : युरोपात कोरोना (corona) व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा हा प्रकोप लक्षात घेता पुढचे किमान 10 वर्ष तरी हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे महत्वपूर्ण विधान BioNTech चे सीईओ उगुर साहिन (CEO Ugur Sahin) यांनी केले आहे.

कोरोना व्हायरस संदर्भातील एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना कोरोनाच्या डेडलाइनबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्याला’न्यू नॉर्मल’ची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे. आगामी 10 वर्षतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे ते म्हणाले. BioNTech ची कोरोनावरील लस अमेरिकेच्या दिग्गज फायझर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विकसित केली आहे. या लशीला सध्या 45 हून अधिक देशांमध्ये सार्वजनिक वापरासाठी मंजुरी देखील दिली आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांचाही यात समावेश आहे.

नव्या स्ट्रेनवरही फायझरची लस परिणामकारक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ब्रिटनमध्ये जेव्हापासून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची उत्पत्ती झाली आहे. तेव्हापासून आठवड्यातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद ब्रिटनमध्ये होत आहे. त्यामुळे भारत, अमेरिकासहीत इतर सर्व देशांना घाम फुटला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही येत्या 6 आठवड्यांमध्ये लस तयार होऊ शकते, असेही साहिन यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी