28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अतिरेकी याकूब मेमनच्या नातलगाबरोबर सलगी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अतिरेकी याकूब मेमनच्या नातलगाबरोबर सलगी

मृतदेह मुंबईत आणून त्याच्या नातेवाईकांनी दफन केला होता. आता या कबरीची सजावट केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केला. त्यानंतर आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनीही हा आरोप केला. शिवसेना सत्तेत असताना कबरीची सजावट झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याचे भूत पुन्हा एकदा जागे झाले आहे. याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप झडू लागले आहेत. अशातच महापौर किशोरी पेडणेकर यांचा याकूब मेमनच्या नातलगासोबतचा एक व्हिडीओ भाजपच्या नेत्यांनी व्हायरल केला आहे. यात महापौर या नात्याने किशोर पेडणेकर यांनी बोलविलेल्या बैठकीत अनेकजण सहभागी झालेले दिसत आहेत. त्यात याकूब मेमनचा नातलग दिसत आहेत. रौफ मेमन असे या नातलगाचे नाव आहे. रौफ हे याकूब मेमनचे चुलत बंधू आहेत.

किशोरी पेडणेकर यांच्यासोबतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अशातच आता शिवसेनेनेसुद्धा एक छायाचित्र व्हायरल केले आहे. या छायाचित्रात रौफ मेमन हे देवेंद्र फडणवीस यांना मोठा पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. रौफ मेमन व देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. या छायाचित्रात चंद्रकांत पाटील हे सुद्धा दिसत आहेत.
हे छायाचित्र नक्की कशासंदर्भातील आहे हे स्पष्ट होत नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच रौफ मेमनसोबतच्या भेटीचा उलगडा होईल.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

Rohit Pawar : रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं…

Ratnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्यासोबत रौफ मेमन यांच्या झालेल्या बैठकीबद्दल स्वतः पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईभरातील कचरा, पाणी तुंबणे या समस्यांच्या अनुषंगाने यशवंत जाधव यांच्या तक्रारीवरून एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या वेळी अनेकजण उपस्थित होते. यशवंत जाधव यांनीच काही तक्रारदारांना आणले होते. या बैठकीत आलेल्या लोकांची नावे मला माहीत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती याकूब मेमनची नातलग आहे, हे सुद्धा मला ठाऊक नव्हते. भाजपची लोकं डोक्यावर पडलेली आहेत. त्यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही, असा संताप किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीस यांच्यासोबत मेमणचे छायाचित्र विधानभवनातील !

शिवसेनेने व्हायरल केलेले रौफ मेमन आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे छायाचित्र विधानभवनातील आहे. विधानभवनातील लिप्ट त्या ठिकाणी दिसत आहे. अनेकजण भेटायला येत असतात. त्यात ही कुणीतरी व्यक्ती होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

याकूब मेमनचा वाद पुन्हा का ?

मृतदेह मुंबईत आणून त्याच्या नातेवाईकांनी दफन केला होता. आता या कबरीची सजावट केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केला. त्यानंतर आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनीही हा आरोप केला. शिवसेना सत्तेत असताना कबरीची सजावट झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

त्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने पलटवार केला होता. याकूब मेमन हा अतिरेकी होता. त्याला फाशी दिल्यानंतर तो मृतदेह भाजप सरकारने नातलगांच्या ताब्यात का दिला, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. नथूराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी आहे. नथूराम गोडसेची अनेक हिंदुत्ववादी विचाराचे लोक पुजा करतात. गांधींजींच्या जयंती व पुण्यतिथी दिवशी त्याची आठवण काढतात. गांधीजींचा पुतळा तयार करून त्यावर गोळ्या झाडल्याचा देखावा तयार करतात, असा आरोप विनय काटे या कार्यकर्त्याने केला होता. याकूब मेमणच्या मुद्द्यावर आता राजकारण पेटल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी