38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयनारायण राणे 'कोंबडी चोर' शिवसेनेची पोस्टरबाजी

नारायण राणे ‘कोंबडी चोर’ शिवसेनेची पोस्टरबाजी

टीम लय भारी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. नारायण राणे ‘कोंबडी चोर’ अशी पोस्टरबाजी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात करण्यात आली आहे (Shiv Sena has launched a poster campaign against Narayan Rane).

मुंबईत पहाटेच्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. नारायण राणे यांचा मोठा फोटो पोस्टरवर लावला होता. त्यावर कोंबडी चोर’ असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. मात्र, पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर हा पोस्टर तातडीने हटवण्यात आला आहे (Shiv Sena corporator Amet Ghole had displayed posters in Dadar TT area).

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

Shiv Sena launched poster against Narayan Rane
शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली

या दरम्यान, पुण्यात कार्यालयात कोंबड्या सोडल्या आहेत. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.

नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. याठिकाणी शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरें बाबत बोललं तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा शिवसैनिकांनी राणे यांना दिला आहे (Shiv Sainiks got in the car and hurled huge stones at the BJP office).

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

‘Would have slapped Uddhav Thackeray’: Narayan Rane’s remarks draw Shiv Sena vs BJP clashes in Mumbai

Shiv Sena launched poster against Narayan Rane
रायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले

काय म्हणाले होते नारायण राणे

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. मात्र , यावरुन राणे म्हणाले होते की, मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे (Filed a case against Narayan Rane).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी