27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयहा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी...

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी उड्डानानंतर मोदींच्या शुभेच्छा

भारताने चंद्रावर पोहचण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आज आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातुन भारताच्या चांद्रयान-3 ने 2.35 वाजता अवकाशात यशस्वी पणे झेप घेतली. काउंट डाउन संपताच इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चंद्रयान- 3 आकाशाच्या दिशेने झेपावले. आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भरतीयांकडून विजयाचा जल्लोष करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी ट्वीट करत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असे त्यांनी म्हटल आहे.

पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर 3.84 लाख किलोमीटर आहे. हा प्रवास केल्यानंतर 23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. 40 दिवसानंतर चंद्रयान- 3 चे रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारताची ही चांद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया, आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल.

हे सुद्धा वाचा: 

आमदार अपात्रतेबाबत चालढकल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भोवण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाची नोटिस

राज्याच्या शाळा व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात; शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

कदाचित दहा वर्षानंतरही भावनिक होऊ; राष्ट्रवादीसोबतच्या मैत्रीबाबत फडणवीस बोलले

जुलै 2019 मध्ये चांद्रयान-2 चे उड्डाण झाले होते. यासाठी 978 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु याचे क्रॅश लॅडिंग झाल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली होती. आत्ता चांद्रयान-3 या मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च केले आहेत. आज चांद्रयान- 3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले असून तब्बल 40 दिवसाच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 हे विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही ही चंद्रावर 14 दिवस सक्रिय असतील. या मोहिमेच्या माध्यमातून तेथील माहिती गोल करून चंद्राची रहस्य उलगडण्यास मदत होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी