32 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरक्राईमजान्हवी-गौरवने एकाच दोरीला गळफास लावून आयुष्य संपविले

जान्हवी-गौरवने एकाच दोरीला गळफास लावून आयुष्य संपविले

नागपूर जिल्ह्यात एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे, पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावातील कॉलेजात शिकणाऱ्या युवक युवतीने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याची चर्चा असून कोणाच्या तरी दबावामुळे त्यांनी आयुष्य संपविले का अशी शंका गावकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळाल्या माहितीनुसार मृतांची नावे जान्हवी नायले आणि गौरव बगमारे अशी आहेत. हे दोघे ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.

मध्यरात्रीच्या सुमारास गौरवच्या घराशेजारील एका वापरात नसलेल्या घरात दोघांनी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आज (दि.5) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर याबाबत तातडीने पोलिसांना खबर केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान गौरव आणि जान्हवीवर कोणाचा दबाव होता का? अशी शंका उपस्थित होत असून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

सनातन धर्म वादात ‘हे’ काय म्हणाले प्रियांक खरगे?
‘या’ कारणामुळे भारतात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो…
अरेरे, कोरोनात सामान्य माणूस आणखीन पिचला, राजकीय पक्ष गबर झाले!

गौरव आणि जान्हवीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चांना उधान आले असून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का? असे देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. दोघांच्या आत्महत्येनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबध असतील तर कोणी त्यांना विरोध करत होते का अशी चर्चा गावकऱ्यामध्ये सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरु केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी