28 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत काय केलं; आमदार अपात्रतेवरुन सर्वोच्च न्यायालय गंभीर

विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत काय केलं; आमदार अपात्रतेवरुन सर्वोच्च न्यायालय गंभीर

शिवसेना पक्षनाव आणि पक्ष चिन्ह तसेच आमदार अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत तीन आठवड्यांनी सुनवाणी होणार असून आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही केस गांभीर्याने घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबत निर्णयाची केस आहे. मात्र ते याबाबत दिरंगाई करत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानरभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशाचा आदर करावा असे सांगत आतापर्यंत त्यांनी याबाबत काय केले यांचे उत्तर मागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्देश देताना तीन महिनयांची मुदत दिली नव्हती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करायला हवा. आम्ही निश्चित कालमर्यादा दिली नसली तरी विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा असा त्याचा अर्थ होत नाही.

आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढची सुनावणी आता दोन आठवड्यांनी होणार असून या सुनावणीवेळी अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत काय केले? याची माहिती द्यावी. आम्ही निश्चित कालमर्यादा दिली नसली तरी या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष अनंतकाळ काम करु शकत नाही. तसेच आमदार अपात्रतेसंबंधी किती काळात हे काम पूर्ण केले जाईल याबाबत विधानसभा अध्यक्षांनी पुढच्या सुनावणीत माहिती द्यावी. याबाबतचे वेळापत्रक त्यांनी न्यायालयाला सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

हे सुद्धा वाचा 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले काश्मीरला; दिली श्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळास भेट
कचरामुक्त होणार मुंबईचा गणेशोत्सव
मुंबईत जन्मलेल्या विक्की कौशलला मराठी भाषेचा लळा; आईसोबतच्या नात्याला मराठीचा गोडवा

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर गेले कित्तेक महिने यावर विधानसभा अध्यक्षांनी काम केले नाही. त्यांच्याकडून वेळकाढूपणा होत असल्याने ठाकरे गटाचे सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधिश चंद्रचुड यांच्याखंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाची बाजू प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांनी मांडली

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी