33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeराष्ट्रीय'महिला आरक्षण विधेयक' आज लोकसभेत मंजूर होणार? महिलांना मिळणार 33% आरक्षण!

‘महिला आरक्षण विधेयक’ आज लोकसभेत मंजूर होणार? महिलांना मिळणार 33% आरक्षण!

केंद्र सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे एक विशेष पाच दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. सोमवारी, (18 सप्टेंबर) संसदेच्या जुन्या इमारतीत अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला असून आजपासून, मंगळवार (19 सप्टेंबर) संसदेच्या नव्या इमारतीत संसदेचे कामकाज पहिले जाईल. ह्या विशेष अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल हे केंद्र सरकारद्वारे स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता मात्र अधिवेशनाचे मुख्य कारण समोर आले असून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे, असे समजले जात आहे. सोमवारी रात्री झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीतून हा निर्णय घेण्यात आल आहे.

लोकसभा आणि राज्यांमधील विधान सभांमध्ये महिलाना 33% आरक्षण देण्याची मागणी आता पूर्ण होताना दिसणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती X (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावरुन दिली. “महिला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचे नैतिक धैर्य फक्त मोदी सरकारमध्ये होते जे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सिद्ध झाले. नरेंद्र मोदी जी यांचे अभिनंदन आणि मोदी सरकारचे अभिनंदन,” पण ही पोस्ट नंतर हटवण्यात आली.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक “आमचे” असल्याचे सांगितले. काँग्रेसने या अहवालाचे स्वागत केले असून कॉँग्रेस पक्ष दीर्घ काळापासून या विधेयकाची मागणी करत आहे. मंगळवारी सोनिया गांधी संसदेत प्रवेश करत असताना या विधेयकाबाबत विचारले असता गांधी म्हणाल्या, “यह हमारा है, अपना है.”

हे ही वाचा 

“ते नेहमी मौन रहायचे पण..” मनमोहन सिंह यांच्याबद्दल कॉंग्रेस खासदार हे काय म्हणाले?

कपिल सिब्बल काय म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत…

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!

महिला आरक्षणला यापूर्वीच काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे संसदेमध्ये या विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग सुकर असल्याचे समजले जात आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश ‘X’ वर म्हणाले, “आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अहवालाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि विधेयकाच्या तपशीलाची वाट पाहत आहोत.” “विशेष अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत यावर चांगली चर्चा होऊ शकली असती आणि गुप्ततेच्या बुरख्याखाली काम करण्याऐवजी सहमती निर्माण करता आली असती,” ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी