31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयनबाब मलिक बस नाम ही काफी है....

नबाब मलिक बस नाम ही काफी है….

टीम लय भारी

आदरणीय मलिकसाहेब ,

सलाम वालेकुम ! नमस्कार !! जय भीम !!!

साहेब , सध्या आपण नॅशनल हिरो आहात . भारतातील सर्वात जास्त टीआरपी असणारे नेते आहात .  आर्यनखान प्रकरणापासून सुरू झालेला आपला प्रवास दिवसेंदिवस आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळे पैलू उलगडून दाखवीत आहे(Nawab Malik: Hero of the country)

बलाढ्य केंद्र सरकारशी पंगा घेणे ही कोण्या येड्यागबाळ्याचे काम नाही . तिथे लागतात जातीचेच .

निर्बंध शिथिल होत असताना राज्य सरकारकडून नवा आदेश जारी

Bank Holiday in December 2021: डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

उत्कृष्ठ शोध पत्रकार

उत्कृष्ट  शोध पत्रकारिता करणारा पत्रकार कसा असावा याचे उदाहरण आपल्याकडे पाहिल्यावर दिसून येते . दररोज नवनवीन माहितीचा खजिना दाखवीत असताना आपण ती माहिती कुठून आणली असेल ? ती कागदपत्रे कशी मिळवली असतील ? याचा विचार केल्यावर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला आपल्याप्रती आदरयुक्त कुतूहल वाटते .

सध्याच्या काळातील पत्रकारितेचे होत असलेले प्रचंड अवमूल्यन पाहता आपण करीत असलेली शोध पत्रकारिता प्रचंड उच्च दर्जाची आहे . जे काम पत्रकारांनी निष्ठेने करायला पाहिजे होते ते काम आपण कितीतरी प्रामाणिकपणे करीत आहात . या वर्षीचा उत्कृष्ट शोध पत्रकारितेचा पुरस्कार आपल्यालाच मिळावा .

क्रडिट कार्ड वापरत असला तर ही बातमी वाचाच, कारण…

अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा मुक्काम! साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू!

हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा . व्यवसायाने पत्रकार नसलेला परंतु उत्कृष्ट शोध पत्रकारिता करणारा व्यक्ति म्हणून आपल्याला पुरस्कार देऊन त्यांनी वेगळा पायंडा पाडावा .

संयम ….

 आपण पत्रकार परिषदेत दाखवीत असलेला संयम कितीतरी उच्च प्रतीचा आहे . जो संयम भल्याभल्यांना जमत नाही तो आपल्या व्यक्तिमत्त्वात सहज दिसून येतो . अतिशय शांत पद्धतीने आपण सर्वांना समजावून सांगत असता . कुठेही आक्रस्ताळेपणा नाही . तुमच्या बोलण्यात कुठेही संदीप पात्रा अथवा केशव उपाध्ये दिसत नाही . आपली बाजू ठामपणे आणि तितक्याच संयमितपणे आपण मांडताना दिसता .

बिनतोड वकिली युक्तिवाद …..

आपण पत्रकार परिषदेत जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यांवर तथाकथित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण दिलेले उत्तर म्हणजे एका उत्कृष्ट वकिलाने केलेला बिनतोड युक्तिवाद वाटतो . एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता कसा असावा तर नवाब मालिक सारखा असावा .

आणि प्रवक्ता कसा नसावा हे संदीप पात्राकडे पाहून ठरविता येते . एखाद्या घटनेवर आपण देत असलेले पक्षाचे मत इतके ठाम आणि स्पष्ट असते की दुसरा प्रश्न विचारण्याची गरजच नसते . परंतु पत्रकारांना कशीतरी वेळ घालवायची असते म्हणून ते उगाचच फिरून फिरून प्रश्न विचारतात .

नबाबी संस्कार ….

आपल्याला भंगारवाला म्हणून हिणवले गेले . संस्कृतीचा टेंभा मिरविणाऱ्या एका पेशव्याने आपल्याला डुक्कर संबोधून त्यांचे उच्च प्रतीचे संस्कार दाखवून दिले . परंतु आपण आपला तोल जरा सुद्धा ढळू दिला नाही . यालाच उच्च प्रतीचे नबाबी संस्कार म्हटले तर वावगे ठरू नये .

मुसलमान आहात म्हणून विरोध

साहेब ,आपण मुसलमान असल्यानेच ही मंडळी आपल्यावर खार खाऊन आहे .सध्याच्या भारतीय मानसिकतेनुसार  मुसलमानाने  किती ही मोठे काम करू देत , ते  कितीही हुशार असू देत , त्याला अनुल्लेखाने मारले जाते . सर्वसामान्य जनतेच्या मनात मुसलमाना विरोधात बीज पेरली जात असल्याने आपल्या हुशारीला मनात असूनही दाद देणारे कमीच आहेत .

त्या तथाकथित संस्कृती रक्षकांना माहित नाही की आपण एक मुसलमान असून सुद्धा मुसलमानाचाच पर्दाफाश करीत आहात .आपण भारतीय असल्याचा तोच सर्वात मोठा पुरावा आहे .

फडणवीसांचा पळपुटेपणा

आपण केलेल्या आरोपांना उत्तर देताना एन . सी . बी . आणि फडणवीसांच्या नाकीनऊ आले आहे . आपण फडणवीस पतीपत्नीवर केलेले आरोप त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अतिशय  गंभीर असे आहेत . त्यामुळे ते सुमडीत गप्प बसले . आपल्या अंगावर आल्यावर कसे साळसुदपणे शांत रहावे हे पेशव्यांकडूनच शिकावे .

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेसारख्या तथाकथित दबंग अधिकाऱ्याकडे तपासासाठी असलेला तो गुन्हा काढून घेण्यात आला हाच आपला सर्वात मोठा विजय आहे . परंतु त्याचे महत्त्व कळून सुद्धा या गोदी बिकाऊ मीडीयाने आपल्या सारख्या नेत्याला त्याचे क्रेडिट दिले नाही . त्यांना त्यांच्या या अपयशाची लाज वाटली .

समस्त भारतीय मुस्लिमांचा राजकीय चेहरा

साहेब आपण लढत असलेल्या लढाईचे महत्व आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा फार मोठे आहे . आपण एक निडर , हुशार  , संयमी नेता म्हणून देशासमोर येत आहात .

देशभरातील मुस्लिमांचे आपण आशास्थान होत आहात . भाजपाची बी टीम ओवेसी यांची जागा हलताना दिसत आहे . साहेब आपली जागा लोकसभेत व राज्यसभेत तयार झालेली आहे याची आपण नोंद घ्यावी .

 झेड सिक्युरिटी देण्यात यावी ….

आपण उघड करीत असलेली प्रकरणे आणि केंद्रीय संस्थांना आणि केंद्र सरकारला आपण देत असलेली आव्हाने पाहता आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येते . म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे की आपल्याला तात्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षितता देण्यात यावी . आपल्यासारख्या मराठी नेत्याला संरक्षण द्यावे .

सरकार म्हणून ठामपणे पाठीशी उभे राहावे

सरकारमधील तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवाब भाईच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे . मालिकांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत दोन दोन मंत्री स्वतःहून हजर राहिले पाहिजे .

सरकरकडून दाखविण्यात येणारी एकीच तुम्हा सर्वांना वाचवू शकेल . नबाब हा एकटा नाही तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत हा खणखणीत संदेश केंद्राला जाणे फार आवश्यक आहे .

मराठी मुसलमान

या तथाकथित मराठी पेशवाईपेक्षा आपण मराठी मुसलमान आमच्यासाठी केव्हाही अभिमानास्पद आहात . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुलेसारख्या मराठी मुसलमानाला संपूर्ण महाराष्ट्र आपला मानतो . श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता मुख्यमंत्री अंतुलेसाहेब होते  यावरून आपल्या लक्षात येईल .

संविधानाचे खरे पाईक

नवाबभाई आपण संविधानाचे खरे पाईक आहात . संविधानाने दिलेल्या  ” राइट टू स्पीक ” या अधिकाराचे आपण तंतोतंत पालन करीत आहात .

आपल्या उज्वल भविष्यासाठी आणि खासदारकीसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा .

आपला चाहता ,

 ऍड . विश्वास काश्यप ,

अध्यक्ष , मी बुद्धिस्ट फाउंडेशन ,

माजी पोलीस अधिकारी .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी