33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयटूलकिटप्रकरणाबाबत भाजपवर राष्ट्रवादीची टीका

टूलकिटप्रकरणाबाबत भाजपवर राष्ट्रवादीची टीका

टीम लय भारी

मुंबई :-  टूलकिटच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीने भाजपवर खोचक टीका केली आहे. टूलकिटप्रकरणी भाजपची बनावटगिरी करत असून, देशात द्वेष निर्माण करत आहे. असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून ही टीका केली आहे. बनावटगिरी करून… मीडियाला मॅनेज करून… लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करतेय, असा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देणारी रितेश, जेनेलियांची भावनिक पोस्ट

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

Will not seek information on corruption in police transfers till June 9, CBI tells Bombay HC

भाजपचा फर्जीवाडा उघड

भाजप मीडिया हाऊस निर्माण करतेय तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, दोन्ही टूलकीट खरे आहे का? याचा भाजपने समोर येऊन खुलासा केला पाहिजे. देशभर बनावट लेटरहेड वापरून टूलकीट तयार करण्यात आले आहेत, हे लोके सांगत आहेत. त्यामुळे भाजपचा फर्जीवाडा समोर आल्याचे ही ते म्हणाले.

तर कारवाईला सामोरे जा

भाजपने जो फर्जीवाडा करून देशभर घृणा निर्माण करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यावर ट्वीटर इंडियाने मॅन्यूप्लेटेड इंडियाचा टॅग लावला आहे. भाजपकडे याबाबतचे खरी कागदपत्रे असतील तर दुरुस्त करून घ्यायला हवी होती. परंतु उलट ट्विटरवर भाजप सवाल उठवत आहे. खरे कागद असतील तर ते दाखवा नाहीतर होणार्‍या कारवाईला सामोरे जा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

संबित पात्रांवर कारवाई

दरम्यान, ट्विटरने टुलकिट प्रकरणी कारवाई करताना संबित पात्रा यांच्या ट्विटला मॅनिप्युलेटेड मीडिया मार्कट केले आहे. ट्विटर पॉलिसीनुसार एखाद्या ट्विटची माहिती अचूक नसेल आणि उपलब्ध माहितीही चुकीची असेल तर अशा प्रकारचा लेबल लावला जातो. व्हिडीओ, ट्विट, फोटो किंवा इतर कोणत्याही कंटेन्टमध्ये हे लेबल लावले जाते. या आधी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या अनेक ट्विटला हे लेबल लावण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी रद्द करण्यात आले होते.

वाद सुरूच

टुलकिटप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेत. भाजपचे सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा म्हणून काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना चिठ्ठीही लिहिली आहे. काँग्रेसच्या एनएसयू या विद्यार्थी संघटनेने पात्रांविरोधात केसही दाखल केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ही भाजपवर जोरदार टीका केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी