29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ही मोठ्या प्रमाणात आहे. लसींचा (Vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या अनेक कंपन्यांनी थेट राज्यांना लस (Vaccine) देण्यास नकार दिला आहे. परंतु देशाचे एक धोरण ठरवावे आणि लसीची (Vaccine) अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी असे नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे (Nawab Malik has said that the Center should formulate a national policy and accept responsibility for vaccinations).

३५ हजार कोटीची अर्थसंकल्पात तरतूद करुन केंद्राने ठरवले तर त्या पैशात देशातील लोकांना मोफत लस (Vaccine) देता येईल, असे ही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले. केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षावरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. परंतु लस (Vaccine) मिळत नाही. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्याबद्दल सांगावे,” असे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले.

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

टूलकिटप्रकरणाबाबत भाजपवर राष्ट्रवादीची टीका

Farm laws: Farmers observe black day to mark six months of protests, raise flags and burn effigies

आज ही रेमडेसिवीर, म्युकरमायकोसिसची औषधे असतील किंवा इतर औषधे असतील ही सर्व औषधे राज्य सरकार पैसे देऊनच घेत आहे. केंद्र मोफत देत नाही नसल्याचे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. याबाबत एक धोरण ठरवून सगळी जबाबदारी घेऊन पैसे द्या आम्ही उपलब्ध करून देतो असे सांगावे. जर हे धोरण ठरवण्यात आली नाही तर याचे पुरवठादार आहेत, ते ज्या राज्यांना जास्त पैसे देतील त्यांनाच ही औषधे देतील. काही राज्यांना पैसे देता येणार नाही ते वंचित राहतील, असे ही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी