29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

टीम लय भारी

पुणे :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 11 एप्रिल २०२१ रोजी होणारी परीक्षा ९ एप्रिल रोजी राज्य शासनाने पुढे ढकलली होती. पण आता ही परीक्षा 4 सप्टेंबर2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे (Finally the MPSC exam will be held on September).

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषगांने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.

पाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, मेल आणि युट्युब होणार बंद

तसेच याबाबत संपूर्ण महिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुत्त्क पूर्व परीक्षेचे आयोजन शनिवार (04 सप्टेंबर 2021) रोजी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच एमपीएससीतर्फे घेतल्या जाणा-या विविध परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, सातत्याने ढकलल्या जात असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी नैराश्यात आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती (There was uneasiness among the students as the dates of the exams were not announced).

Finally the MPSC exam will be held on September
एमपीएससी

ऑलिम्पिकचे खेळाडू मोदींचे अतिथी

MPSC Prelims 2021 Exam Date for Subordinate Service announced on mpsc.gov.in, Exam on September 4

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 9 ऑगस्ट रोजी तर अकरावी प्रवेशाची सीईटी येत्या 21 ऑगस्टला घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीनेसुध्दा संयुक्त परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती.

एमपीएससीतर्फे 2019 मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून 3 लाख 82 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी