31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबई'शिवसेनेला उद्धव ठाकरेच वाचवू शकतात, शिंदेंना भाजपा गिळंकृत करणार'

‘शिवसेनेला उद्धव ठाकरेच वाचवू शकतात, शिंदेंना भाजपा गिळंकृत करणार’

टीम लय भारी

मुंबई : विशेष विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अखेरीस भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने आपले बहुमत सिद्ध केले. यानंतर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर ते कसे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, हे पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न देखील केला.

याचवेळी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना उद्देशून अनेक पोस्ट करण्यात आल्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सावध राहा असे देखील सांगण्यात आले. अशीच एक पोस्ट ट्विटरला करण्यात आली आहे. यामध्ये ‘शिवसेना फक्त उद्धव ठाकरेच वाचवू शकतात. आज शिंदे कितीही शक्तिशाली वाटत असले तरी भाजपा त्यांना गिळणार म्हणजे गिळणारच. उद्धव ठाकरे धूर्त राजकारणी आहेत, भाजपाचा डाव त्यांनी ओळखलेला आहे आणि ते त्याला पुरून उरतील ही अपेक्षा. त्यांनी ग्राऊंडवर उतराव.’ असे लिहिण्यात आले आहे. ही पोस्ट शेखर गावडे नामक एका सामान्य नागरिकाकडून करण्यात आली आहे.

एकंदरीतच, उद्धव ठाकरे हे वाटत नसले तरी, खूप हुशार राजकारणी आहेत, त्यांच्यावर स्वर्गीय बाळासाहेबांचे राजकीय संस्कार आहेत, हे त्यांच्या वागण्यातून कायमच लक्षात येते. त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेला राजकारणी कधीही पुन्हा निवडून येत नाही, हे स्वतः राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे स्वतःला शिवसैनिक बोलत असले तरी, पण भाजपच्या गळाला लागलेले एकनाथ शिंदे यांच्या ऱ्हासाचे कारण भाजपचं बनणार असे देखील अनेकांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांकडून सरकारला सल्ले देण्यात येत असतात. नेटकऱ्यांकडून सरकारवर आणि इतर राजकारण्यांवर कायमच टीका टिपण्णी करणाऱ्या पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेटकऱ्यांकडून करण्यात येणारी भविष्यवाणी, त्यांच्याकडून देण्यात येणारे सल्ले अगदी खरे आणि उपयोगी देखील ठरतात. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऱ्हासाला खरंच भाजपचं कारणीभूत ठरतात का? हे पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

राज्य सरकारच्या महत्वाच्या‘तीन‘ घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी