27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्ररस्त्यावर धावणारी 'जलपरी' तुम्ही पाहिली का?

रस्त्यावर धावणारी ‘जलपरी’ तुम्ही पाहिली का?

टीम लय भारी 

नागपूर : योग्यवेळी डागडूजी करण्यात न आल्याने लालपरीच्या प्रवाशांना पावसांच्या धारांमध्ये भिजत प्रवास करावा लागत असल्याचे केविळवाणे दृष्य शिवसेनेच्या पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्रा. शिल्पा बोडखे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून नागपूर महानगरपालिकेला याबाबत जाब विचारला आहे.

प्रा. शिल्पा बोडखे यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओवर भाष्य करत बोडखे लिहितात, नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या लालपरी बसला आता जलपरी नाव द्यायचे का…? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी महापालिकेलाच धारेवर धरले आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये खचाखच भरलेली बस दिसत असून त्यात उभे राहणाऱ्या आणि बसणाऱ्यांवर पावसाचे पाणी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये बसलेली आजी अंगावर पाणी पडू नये म्हणून चक्क हातीची ओंजळ करून त्यात पाणी जमा करत असल्याचे दिसत आहे, शिवाय इतर प्रवासी सुद्धा अंगावर पाणी पडतंय म्हणून त्रस्त झाल्याचे दिसत आहे.

राज्यात कुठेही प्रवास करायचा असल्यास सर्वसामान्यांचा प्राधान्यक्रम नेहमीच लालपरी असतो, परंतु जेव्हा याच लालपरीत प्रवास करणे जिकीरीचे होते तेव्हा दोष नेमका कोणाचा यावर प्रश्नांचे वावटळ उठत राहते. दरम्यान,हाच मुद्दा उपस्थित करत लालपरी बसला जलपरी म्हणत प्रा. शिल्पा बोखडे यांनी या दुर्लक्षित बसप्रवासाकडे लक्ष वेधले आहे.

हे सुद्धा वाचा…

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

सिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

क्रुरतेची सीमापार! भुंकणाऱ्या श्वानावर राॅड हल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी