29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

टीम लय भारी

मुंबई : राजकीय बंडातून महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात चर्चांना एकच उधाण आले. कोणी यावर दुःख व्यक्त केले तर कोणी कोणी चक्क मीम्स तयार करून पक्षांना आणखी डिवचले. दरम्यान मनसे नेते गजानन काळे यांनी सुद्धा काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना लक्ष करत काॅंग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका केली, मात्र त्यावर पाटील यांची लेक शरयू देशमुख यांनी वडिलांची बाजू घेत काळे यांना यावरून चांगलेच फटकारले आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मिडीयावर काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर एक मीम शेअर केले आहे. त्यामध्ये “आमचा कोणीच गेम करत नाही, आम्ही गेम मध्येच नाही”, अशा पद्धतीच्या आविर्भावातील बाळासाहेब थोरात यात दिसून येत आहेत.

https://twitter.com/SharayuDeshm/status/1543935346353659904?s=20&t=V3bLD5iKVf0Xsf1xuGSpAQ

दरम्यान थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी काळे यांचे हे ट्वीट आपल्या पोस्टमध्ये शेअर करत टीका केली आहे. शरयू पोस्टमध्ये लिहितात, “.. @GajananKaleMNS तुम्ही जेवढ्या वर्षाचा आहात ना त्यापेक्षा जास्त वर्ष साहेबांनी विधिमंडळात घालवली आहेत. हे असले जोक मारण्यापेक्षा स्वतःच घर सांभाळा.” असे म्हणून गजानन काळे यांना शरयू यांनी चांगलेच सूनावले आहे.

हे सुद्धा वाचा…

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

VIDEO : एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरी करण्याचे कारण

VIDEO : उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी केसरकरांनी घेतली डुलकी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी