38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे वेबसाईटवरुन साधणार जनसंवाद

सुप्रिया सुळे वेबसाईटवरुन साधणार जनसंवाद

टीम लय भारी

पुणेः ‘संसद रत्न‘ अशी ओळख असलेल्या सुप्रिया सुळे ‘जनसंवाद‘ साधणार आहेत. सामान्य लोकांनी विचारलेले प्रश्न थेट लोकसभेत मांडणार आहेत. त्यासाठी त्यांनी ‘आस्क मी डाॅट सुप्रिया सुळे डाॅट नेट‘ https://askme.supriyasule.net  ही वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर नागरिक आपली माहिती, प्रश्न सविस्तर पाठवू शकतात. तुमचा प्रश्न सुप्रिया सुळेंकडे पोहोचल्यानंतर एक एसएमएस देखील लोकांना मिळणार आहे. लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी त्यांनी अशा प्रकारे सक्रिय सहभाग आणि संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला, तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. या उपक्रमाविषयी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारण आणि समाजकारण करत आहे. त्यामुळे संवादावर माझा विश्वास आहे. जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी आपल्याला जनता निवडून देते. मला संधी दिल्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची ऋणी आहे.

जनतेचा सहभाग वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचे प्रश्न विचारु शकतात. त्यातील महत्वाचे प्रश्न, सूचना, विषय मी संसदेत मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावे. शिवाय या संवादाला अणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सूचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. एका कठीण काळातून आपण जात आहोत. जनतेची प्रतिनिधी या नात्याने संसदेत या विषयावर देखील आपण आवाज बुलंद करु असेही त्या यावेळी म्हणाल्या. यापूर्वी सुप्रिया सुळेंनी लोकसभेत वेळोवेळी आपल्या मतदारसंघासह राज्यातील व देशातील अनेक जनहिताच्या विषयांवर आवाज उठवला आहे.

हे सुध्दा वाचा:

राजीनामा सत्राने शिवसेना हादरली

VIDEO : नरेंद्र मोदी हे सावकार दोस्तांचे ‘सेल्समन’

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी