27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeव्हिडीओCovid-2019 : भाजप आमदाराने रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या, घोळका केला, अन् सामाजिक...

Covid-2019 : भाजप आमदाराने रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या, घोळका केला, अन् सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्यही केले

टीम लय भारी

हैदराबाद : ‘कोरोना’च्या ( Covid-2019 ) विरोधात एकजूट दाखविण्यासाठी मेणबत्त्या, पणत्या पेटवा असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा विपर्यास करीत एका भाजप आमदाराने घराबाहेर घोळका केला. मशाली पेटविल्या, अन् सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य सुद्धा केले.

‘दिल्लीची दळिद्री भारतभर पसरली आहे. या दळिद्रीला शूट आऊट करा’, असे वादग्रस्त आवाहन या आमदार महाशयांनी देशभरातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. लॉकडाऊनची ऐसीतैशी करून बेलगाम वक्तव्य करणाऱ्या या आमदार महाशयांनी हा वादग्रस्त व्हिडीओ स्वतःच्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे.

‘दारात व खिडक्यात उभे राहून पणत्या पेटवा’ असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. पण मोदी यांच्या या आवाहनालाही आमदार महाशयांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसत आहे. मेणबत्ती व पणती अपुरी पडेल की काय म्हणून त्यांनी हातात मशाल घेतली आहे.

सोबतच्या तब्बल डझनभर कार्यकर्त्यांच्या हातातही मशाली दिसत आहेत. घोळका करून आमदार महाशय व्हिडीओमध्ये बेलगाम वक्तव्य करीत असल्याचे दिसत आहे. ‘कोरोना’च्या ( Covid-2019 ) युद्धाविरोधात एकजूट व्हा, अन् त्याचे प्रदर्शन करा असाही बावळटपणाचा सल्ला या आमदार महाशयांनी दिला आहे.

आमदार महाशय व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, कोरोनाला ( Covid-2019 ) हरविण्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन नऊ मिनिटे मेणबत्ती, टॉर्च अथवा पणत्या पेटवा असे पंतप्रधानांनी आवाहन केले होते. ‘कोरोना’ला हरविण्याच्या युद्धात सगळ्यांनी एकजूट व्हावे यासाठी हे आवाहन होते. पंतप्रधान आवाज देतात, आणि देशातील सगळी जनता समर्थन देत असल्याचे आपण पाहात आहोत. कारण भारतातील जनतेलाही वाटते की, कोरोनाला ( Covid-2019 ) हरवायचे आहे. त्यामुळे आपण एकजूट होऊन त्याचे प्रदर्शन करायला हवे. या लढाईत डॉक्टर्स व अन्य लोक सेवा बजावत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. अधिकाऱ्यांनाही धन्यवाद.

पुढे त्यांनी बेलगाम वक्तव्य केले आहे. ‘ जे डॉक्टरांवर, नर्सेसवर हल्ला करतात. अश्लिल व्हिडीओ बनवितात. मी त्या व्यक्तींचा धिक्कार  व विरोध करीत आहे. ही दिल्लीची दळिद्री पुर्ण भारत देशात पसरत चालली आहे. त्या दळिद्रीला खतम करायचे आहे. माझे सगळ्या मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, दिल्लीची ही दळिद्री पूर्ण देशभरात फैलावली आहे. त्यांना शूट आऊट करा.’

वास्तवात, डॉक्टरांवर, नर्सेसवर हल्ले करणाऱ्या घटनांचा विशिष्ट समाजाशी काहीही संबंध नाही. गेल्या पाच – सहा दिवसांत व्हायरल झालेले असे व्हिडीओ या समाजाशी संबंधित नसल्याचे उघड झाले आहे. तरीही आमदार राजा सिंग यांच्यासारखे सनातनी या खोट्या व्हिडीओंवरून लोकांची माथी भडकविण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे.

धक्कादायक म्हणजे, या आमदार महोदयांचा हा बेलगाम व्हिडीओ काही तासांतच तब्बल ४ हजार जणांनी इतरत्र शेअर केला आहे. १७ हजार जणांनी लाईक केला आहे, तर १.५ हजार जणांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश असल्याचे दिसत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेला आवाहन केले होते. ‘कोरोना’नंतर ( Covid-2019 ) आणखी एक व्हायरस आला आहे. हा व्हायरस सामाजिक दुही निर्माण करण्याचे काम करीत आहे. असे संदेश कुणी सोशल मीडियावर पाठविले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या एकजूटीला गालबोट लागणार असेल तर मी वाट्टेल त्या थराला जाऊन कारवाई करेन’ अशी तंबी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. ठाकरे यांच्या या तंबीनंतर राज्यात दोन समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली आहे.

आमदार राजा सिंग यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल

आमदार राजा सिंग हे धार्मिक विद्वेष पसरविणारी वक्तव्ये सतत करीत असतात. अशा बेजाबदार विधानांप्रकरणी यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.

हे सुद्धा वाचा

PoliceAction : धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज पाठविणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टरला अटक

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

WarAgainstVirus : जादा दराने वस्तू विकणार्‍या दुकानदारांना सरकारचा कारवाईचा इशारा

तबलिजींच्या कार्यक्रमातील व्हिडीओ किती खरे, किती खोटे ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी