34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics : देवेंद्र फडणवीस खोटारडे, आभासी आकडे दाखवून केली दिशाभूल

Politics : देवेंद्र फडणवीस खोटारडे, आभासी आकडे दाखवून केली दिशाभूल

टीम लय भारी

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधान सभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत असा टोला परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार परिषदेत लगावला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे दावे केले जात असताना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला केलेल्या मदतीचा (Politics) दावा खोडून काढला.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 1750 कोटी रुपयांचे गहू केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाले. पण प्रत्यक्षात मात्र इतके गहू महाराष्ट्राला मिळालेच नाहीत. ट्रेनबाबतही फडणवीसांनी (Politics) खोटा दावा केला. मजुरांसाठी ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून गोंधळ सुरू आहे. दिलेल्या वेळेत ट्रेन न आल्याने मजुरांना ताटकळत उभे केले जात आहे. ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या आहेत. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोटे असताना त्यांना 1500 ट्रेन दिल्या तर आपल्याला केवळ 700 ट्रेन देण्यात आल्या, असे म्हणत महाविकास आघाडीच्या या तीन नेत्यांकडून फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्याला खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच महाराष्ट्राच्या हक्काचे पैसेही केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अधिवेशन लवकर स्थगित करत कोरोनाविरोधाच्या लढ्याला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन सुरु झाला. त्याला आता दोन महिने होऊन गेले आहेत. या दोन महिन्याच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले आहेत. उद्योग बंद पडले आहेत. लोकांना घरातच थांबावे लागते आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार समर्थपणे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. आमच्या सरकारने (Politics) प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे हे तीन नेते म्हणाले.

https://www.facebook.com/JayantRPatilofficial/videos/3217599594937405/?v=3217599594937405

स्थलांतरित मजूर दोन महिने घरात राहिल्यामुळे त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली. ते रस्त्यावर आले. ट्रेन सुरु झाल्यावर प्रथम खर्च पक्ष कार्यकर्ते, पदाधिका-यांनी उचलला. अनेक सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यानंतर तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. स्थलांतरित मजुरांसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील बरेच पैसे आतापर्यंत वापरण्यात आले आहेत. मजुरांच्या ट्रेनचे तिकिट, जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र सरकार करत आहे. याशिवाय जे लोक पायी निघाले होते त्यांचीदेखील व्यवस्था केली. वेळोवेळी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर बसेसची व्यवस्था केल्याचा दावाही (Politics) या तीन नेत्यांनी संयुक्तपणे केला.

परब यांनी सांगितले की, सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असे केंद्राने सांगितले होते. मात्र तसे काहीही नाही असेही परब यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये, (Politics) असेही परब यांनी स्पष्ट केले.

भाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन (Politics) अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते राजकारण करत आहेत असेही थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत असेही थोरात म्हणाले.

कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. कोरोनाच्या संकटाशी महाराष्ट्रशी लढतो आहे. 25 मार्च पासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला या लॉकडाउनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणे सुरु आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही खूप मोठी आहे. महाराष्ट्र हे देशाचे व्यवसाय केंद्र आहे. स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांची (Politics) सरकारला कोरोना काळात मोलाची मदत होते आहे. मुंबईची स्थिती सध्या काळजी करावी अशीच आहे. कोरोनाच्या संकटातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. मात्र कुणाचीच गैरसोय होऊ नये, असे आपण कार्य करतो आहोत. उपाययोजना राबवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा…

शरद पवारांच्या राज्यपाल भेटीमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत चर्चा

अनिल देशमुख रेल्वे मंत्र्यांवर संतापले, महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव आखल्याचा केला आरोप

‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख – धनंजय मुंडेंनी केले कौतुक

देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी