33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईCorona : ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख...

Corona : ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख – धनंजय मुंडेंनी केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई : प्रसाद आणि वर्षा या दोघाही पती – पत्नींना ‘कोरोना’ची ( Corona ) लागण झाली आहे.  घरी फक्त दीड वर्षाचा मुलगा आणि वयोवृद्ध आई एवढे दोघेचजण राहतात. त्यात आता आईलाही कोरोनाची ( Corona ) लागण झाल्याची भर पडली.

दोन वर्षाच्या मुलाला मामाकडे ठेवायची वेळ आली. या कठीण प्रसंगातही खचून न जाता आम्ही कोरोनावर ( Corona ) मात करून परत येऊ अशी जिगर या दोघांनी दाखविली आहे. या जिगरबाज दांपत्याने आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच साजरा केला.

Corona : ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख – धनंजय मुंडेंनी केले कौतुक

ही कहाणी आहे मुंबईतील अंधेरीच्या ( पूर्व ) एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची. तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या तरुण पोलीस कर्मचाऱ्यास कर्तव्य बजावताना ‘कोरोना’ची ( Corona ) लागण झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणचा बंदोबस्त, ‘कोरोना’वर ( Corona ) उपचार सुरू असलेल्या रूग्णालयातील ड्यूटी यांमुळे चार दिवसांपूर्वी प्रसाद यांना ‘कोरोना’ची बाधा झाली.

तसे ते मागचे आठ – पंधरा दिवस घरीही गेले नव्हते. मात्र मागच्या आठवड्यात पत्नी तीन वेळेला आजारी पडली. त्यामुळे ते घरी गेले. स्वतःला ‘कोरोना’ची ( Corona ) लागण झाल्याचे प्रसादला माहितच नव्हते. त्यामुळे त्यांच्यापासून पत्नीकडेही हा आजार संक्रमित झाला. त्यापाठोपाठ त्यांच्या आईलाही आता कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुदैवाने पोलिसांसाठी राखीव असलेल्या एका रुग्णालयात पती पत्नीला एकाच वॉर्डात ठेवण्यात आले आहे.

अशाही परिस्थितीत या दांपत्याने आपला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या जिगरबाज दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या ट्विटर वर शुभेच्छा दिल्या, तसेच कोरोनावर ( Corona ) मात करण्याच्या त्यांच्या या लढाऊ वृत्तीचे कौतुकही केले.

लग्नाच्या वाढदिवसाला एकमेकांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही भेट नव्हती. फूल सुद्धा नव्हते. पत्नी वर्षाने पतीला छानशी भेटवस्तू द्यायचे पंधरवड्यापूर्वी ठरविले होते. पण त्या अगोदरच दोघांनाही हॉस्पिटलमध्ये यावे लागले.

एकीकडे मुलाची काळजी असली तरी मागील पाच दिवसांपासून हे दोघेजण अतिशय सकारात्मकरित्या आजाराशी लढा देत आहेत. ‘आम्ही पुन्हा येऊ’ असा दोघांनाही विश्वास व्यक्त केला आहे.

Mahavikas Aghadi

‘मला लवकरच पुन्हा ड्युटीवर जॉईन व्हायचे आहे.  काम ही मेरा धर्म है, असे म्हणत हा पोलीस कर्मचारी फोनवर बोलताना आपल्या मित्रांनाही ‘कोरोना से क्या डरना?’ असा धीर देत आहे.

हा जिगरबाज पोलीस लवकरच कोरोनावर ( Corona ) मात करून आपल्या घरी परत येवो हीच प्रार्थना सर्वजण करत आहेत.

मला ड्युटीवर परत जॉईन व्हायचंय…म्हणत प्रसाद ने व्यक्त केली पीएसआय होण्याची इच्छा!

‘ड्युटी नसेल तर करमत नाही, इथं हॉस्पिटल मध्ये सर्व चांगली व्यवस्था आहे. पण मला लवकर नीट होऊन परत यायचं आहे, मला पीएसआय व्हायचं आहे; तशी मी तयारी सुद्धा करतो आहे.’ अशा शब्दात प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नित्याने व्यायाम, योगासने, अभ्यास करणाऱ्या प्रसादला पीएसआय होण्याची इच्छा आहे. रुग्णालयातील कोरोना वॉर्ड मध्ये काही पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अशी इच्छाही प्रसादने व्यक्त केली आहे. त्याची पत्नी वर्षा गृहिणी असून तिलाही नोकरी करण्याची इच्छा आहे.

‘केवळ आई व मुलाची काळजी वाटते, आम्ही दोघे तर कोरोनावर मात करून परत येणारच….’ असे प्रसाद जेव्हा आत्मविश्वासाने सांगतो तेव्हा त्याच्यातील पोलीस, बाप आणि मुलगा या तिन्ही भूमिका जागृत होतात.

हे सुद्धा वाचा

Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर

Bachchu Kadu : भाजपसह नारायण राणेंवर बच्चू कडूंची सडकून टीका, लोकं तुम्हाला दारात सुद्धा उभे करणार नाहीत

Politics : सरकारला अस्थिर करण्याचा भाजपसह राज्यपालांचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी