33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजभारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

टीम लय भारी

दुबई : जागतिक टी-ट्वेंटी स्पर्धा सध्या दुबई येथे सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा  पराभव केला. न्यूझीलंड संघाने ८ गडी राखत भारतीय संघाचा पराभव केला. या सामन्यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे (Shoaib Akhtar’s reaction on New Zealand V/S India match).

“भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सोडता बाकी गोलंदाजांची खेळी ही सर्वसामान्य होती. त्याचबरोबर ईशान किशन याला सलामीवीर म्हणून का पाठवण्यात आले ? रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सुद्धा व्यवस्थित फलंदाजी केली नाही. मला भारताचा हा गेमप्लानच काही समजला नाही. ” अशा शब्दात अख्तर याने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

Tadap: फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा पार्लरचा ग्लो

त्याचबरोबर या सामन्यात भारताची खेळी मला सर्वसामान्य वाटत होती. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती या दोघांची गोलंदाजी सोडली तर, बाकी सर्वांची गोलंदाजी ही सर्वसामन्य होती. अशा शब्दात अख्तर याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. शोएब अख्तर याने आपला व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

भारतीय संघ 

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला  १११ धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात लोकेश राहुल याने १८  ईशान किशनने ४, रोहित शर्माने १४, विराट कोहलीने ९ धावा केल्या. तर यष्टीरक्षक रिषभ पंत याने १२, हार्दिक पंड्या २३, शार्दूल ठाकूर ३ आणि रवींद्र जडेजा याने नाबाद २६ धावा केल्या होत्या. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने न्यूझीलंड संघाचे २ गडी बाद केले.

शेहनाज गिलची दिवंगत सिद्धार्थ शुक्लासाठी खास पोस्ट

Virat Kohli: India were not ‘brave enough with bat or ball’ against New Zealand

न्यूझीलंड संघ 

न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल याने २० धावा, डैरील मिटचेल ४९ धावा केल्या. तर न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराने नाबाद ३३ धावा, आणि डेव्होन कॉनवे याने नाबाद २ धावा केल्या. तर ट्रेंट बोल्ट याने ३, टीम साऊथीने १, अडाम मिलने १ आणि ईश सोडी याने २ गडी बाद केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी