35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयआपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

आपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

टीम लय भारी

मुंबई :- देशभरात कोरोनाची दुसर्‍या लाट ओसरत असतांना तज्ञांकडून तिसऱ्या लाटेचे अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांना होणारा लसीकरणाचा पुरवठा याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यावेळी मोदी म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट आपल्या दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा सतर्कतेचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे (Prime Minister Narendra Modi has warned the state chief ministers).

आज मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा ही बैठक सकाळी अकरा वाजता घेतली. यावेळी ते म्हणाले युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे, असे सांगताना कोरोनाची तिसरी लाट आपल्याही दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा सतर्कतेचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

कोरोना संकटाच्या काळात सर्वच राज्य सरकारांनी एकमेकांपासून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता आपण तिसऱ्या लाटेच्या टप्प्यावर उभे आहोत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजूनही वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले (This is a matter of concern, Modi said).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन या सर्व मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. यावेळी मोदींनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत (Modi has instructed to be vigilant from the third wave of corona).

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

Maharashtra, Kerala Covid situation matter of grave concern: PM Modi’s top quotes

Prime Minister Narendra Modi has warned the state chief ministers
पंतप्रधान नरेंद्र मोदी

लसीकरणावर भर द्या

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. तिथे लसीकरणावर भर दिला पाहिजे. टेस्टिंगमध्ये आरटीपीसीआर चाचणीवर अधिक भर दिला पाहिजे. सर्व राज्यांमध्ये आयसीयू बेड्स, टेस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी निधी दिला जात आहे. केंद्राने आतापर्यंत 23 हजार कोटींचा निधी दिला आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महाराष्ट्र आणि केरळात सर्वाधिक रुग्णसंख्या

गेल्या आठवड्याभरात 80 टक्के केसेस आजच्या बैठकीत सामिल झालेल्या सहा मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील आहेत. महाराष्ट्र आणि केरळातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

PM Modi to inaugurate 5-star hotel atop Gandhinagar train station shortly | Live Updates

हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे

तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली पाहिजे. गेल्या आठवड्यात युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. अमेरिकेतही रुग्ण संख्या वाढत आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे, असे सांगतानाच सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी दिली नियोजनाची माहिती

यावेळी, कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक गोष्टींचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी