33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपीडब्ल्यूडी - महानगरपालिकेची टोलवाटोलवी, बच्चू कडूंची संघटना खवळली

पीडब्ल्यूडी – महानगरपालिकेची टोलवाटोलवी, बच्चू कडूंची संघटना खवळली

टीम लय भारी

मुंबई : नवी मुंबईत सायन – पनवेल महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधार असतो. या महामार्गावरील पथदिवे लावलेच जात नाहीत. कारण पथदिवे कुणी लावायचे यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात मतभेद आहेत. या दोन्ही यंत्रणांच्या बेजबाबदारपणामुळे वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे ( PWD and Navi Mumbai corporation have disputes).

या दोन्ही यंत्रणांच्या विरोधात आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने दंड थोपटले आहेत. संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर व ठाणे जिल्हाप्रमुख चंद्रकांत उतेकर यांनी पीडब्ल्यूडी (PWD) व महापालिकेला लेखी पत्र लिहिले आहे. दोन्ही यंत्रणांनी आपापसांतील वाद मिटवून लवकर पथदिवे सुरू करावेत. अन्यथा संघटना जोरदार आंदोलन करेल, असा इशारा या पत्रांद्वारे दिला आहे.

पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार, रस्ते खचणाऱ्या ठिकाणीही बोगस काम

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!

अंधार असल्यामुळे या महामार्गावर दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरूस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात कार, बस आणि मल्टी एक्सेल गाड्या वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत वाहन चालवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची माहिती चंद्रकांत उतेकर यांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

PWD and Navi Mumbai corporation have disputes
नवी मुंबई महानगरपालिका

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

In Himachal, MLA Helps Rescue Cow Stuck in Pit Dug By PWD

संघटनेने आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले. महामार्गावरील दिव्यांच्या खांबांवर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊ शकते. परिणामी अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नवी मुंबई महानगरपालिकेने लक्ष घालावे अशी मागणी संघटनेने केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी