31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशरद पवारांची दिल्लीत खलबते, जयंत पाटलांची खेडोपाड्यात बांधणी

शरद पवारांची दिल्लीत खलबते, जयंत पाटलांची खेडोपाड्यात बांधणी

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बळकटीकरण करण्यासाठी शरद पवार नवी दिल्लीत व्यूहरचना करीत आहेत. दुसऱ्या बाजूला याच हेतूने जयंत पाटीलांनी ‘खेड्याकडे चला’ मोहीम सुरू केली आहे ( Sharad Pawar and Jayant Patil focused on NCP development ).

‘गुरू नवी दिल्लीत, तर चेला गावोगावी’ असे नियोजनबद्ध डावपेच राष्ट्रवादी काँग्रेसने आखले आहेत ( Sharad Pawar in Delhi, and Jayant Patil at rural Maharashtra ).

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी सतत राज्यभर दौरे करीत आहेत ( Jayant Patil’s tour in Maharashtra ). त्यांनी काही महिन्यांपूर्वी विदर्भाचा दौरा केला होता. आता ते मराठवाड्याचाही दौरा करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

…ताई, मीच तुमचे आभार मानतो; धनंजय मुंडे जेव्हा परिचरिकांना हात जोडतात!

‘शरद पवार करणार ‘शोले’चा रिमेक’

शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत काय म्हणाले जाणून घ्या

मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

तीसरे मोर्चे की तैयारी नहीं:शरद पवार के घर हुई मीटिंग का एजेंडा थर्ड फ्रंट नहीं; राकांपा नेता ने कहा- मीटिंग उन्होंने नहीं बुलाई

येत्या 24 जूनपासून ते मराठवाडा दौऱ्यावर रवाना होणार आहेत. औरंगाबाद, जालना, लातूर, बीड व उस्मानाबाद हे मराठवाड्यातील सगळे जिल्हे ते पिंजून काढणार आहेत ( Jayant Patil on Marathwada tour ).

यावेळी ते राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. शिवसेनेसोबतच्याही पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत ( Jayant Patil meets to NCP and Shivsena leaders ). शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहेत. त्या अनुषंगाने जयंत पाटील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे 100 विधानसभा मतदारसंघांवर ‘लक्ष्य’

विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते, तिथे अधिक लक्ष दिले जाणार आहे. या मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी जयंत पाटील हे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले ( Sharad Pawar guides to Jayant Patil for NCP Progress ).

आमचा ‘यू ट्यूब चॅनेल’ सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी