टीम लय भारी
मुंबई :- देशातील राजकीय वर्तुळात सध्या रोज नवीन चर्चांना उधाण येत आहे. प्रत्येक नेता हा नवीन विधान देत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल ट्विट चर्चेचा विषय बनला आहे (Sharad Pawar to do remake of Sholay).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा भेट झाली. दुसऱ्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य दिले. यात ते म्हणाले, तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल. यावरही आपला विश्वास नाही. असं किशोर यांनी सांगितलं. आज शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत आहे (Sharad Pawar to do remake of Sholay).
शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत काय म्हणाले जाणून घ्या
आदित्य ठाकरेंनी देखण्या गावाचे केले कौतुक
या सर्व घडामोडींवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक मजेशीर पण खोचक ट्वीट केले.
भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते.
‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2021
भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे. अशा मजेशीर पण खोचक शब्दात अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे (Sharad Pawar to do remake of Sholay).
मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना
अतुल भातखळकर यांच हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे. यावर लोक हसत आहेत. त्यांच्या या ट्विट वर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. हे ट्विट सध्या वेगाने व्हायरल होत आहे.