30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्र...ताई, मीच तुमचे आभार मानतो; धनंजय मुंडे जेव्हा परिचरिकांना हात जोडतात!

…ताई, मीच तुमचे आभार मानतो; धनंजय मुंडे जेव्हा परिचरिकांना हात जोडतात!

टीम लय भारी

बीड :-  आज बीड जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे हे 15 रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी येथील परिचरिकांना हात जोडून, ‘ताई माझा सत्कार नको, खरं तर मीच तुमचा सत्कार करून आभार मानायला हवेत’ असे वक्तव्य केले आणि मुंडे यांच्यातील संवेदनशील पणाच्या चर्चा पुन्हा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत (Dhananjay Munde joins hands with the nurses).

धनंजय मुंडे हे राज्य सरकारने बीड जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या 15 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी येथे सेवेत असणाऱ्या काही परिचारिकांनी पुष्पगुच्छ घेऊन धनंजय मुंडे यांच्या कडे त्यांचे स्वागत-सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.

Dhananjay Munde joins hands with the nurses
धनंजय मुंडे

‘शरद पवार करणार ‘शोले’चा रिमेक’

शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीपासून शिवसेनेला दूर का ठेवले? संजय राऊत काय म्हणाले जाणून घ्या

यावेळी मनाने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांनी त्या परिचारिकांना अत्यंत नम्रपणे, “ताई, तुम्ही सर्वांनी कोविड वॉर्डात सेवा दिलीत, लोकांचे लसीकरण करण्यात योगदान देत आहात, खरं तर मीच तुमचे स्वागत-सत्कार करून आभार मानायला हवेत” असे म्हणत सर्व परिचारिकांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्वच परिचारिका भगिनींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते (Dhananjay Munde joins hands with the nurses).

आदित्य ठाकरेंनी देखण्या गावाचे केले कौतुक

“Wasn’t Political,” Says NCP After 8 Parties Meet At Sharad Pawar’s House

यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांसह विविध पक्षातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

धनंजय मुंडे हे त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे सुपरिचित आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे आज पुन्हा एकदा त्यांच्यातील संवेदनशील लोकप्रतिनिधीचे दर्शन घडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत! (Dhananjay Munde joins hands with the nurses).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी