33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसिनेमासोनू सूद देणार मोफत CA चे शिक्षण; या साइटवर जाऊन करा अर्ज

सोनू सूद देणार मोफत CA चे शिक्षण; या साइटवर जाऊन करा अर्ज

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाने शिरकाव केल्यापासून अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीला धावून आला आहे. कोरोना महामारीच्या काळात सोनूने सामान्य लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सोनूचे हे कार्य अजूनही सुरू आहे. आता सोनू सूद CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंटचे मोफत शिक्षण देणार आहे (Sonu Sood CA will provide free education of Chartered Accountants).

सोनू सूदने आपल्या उत्कृष्ट कामाने सर्व देशातील जनतेची मने जिंकली आहेत. त्याच्या या कामाचे सर्व स्तरांवर कौतुक केले जात आहे. आता सोनू सूद CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंटचे मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना देणार आहे. यासंदर्भात त्याने त्याच्या सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट वर पोस्ट केली आहे (In this regard, he has posted on all his social media accounts).

सोनूने ‘सोनू सूद चॅरिटी फांऊडेशन’ अंतर्गत सीएचे (CA) शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी तसेच कोचिंग, प्लेसमेंट मिळवून देण्यास मदत करणार आहे. ही संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सोनू सूदच्या चॅरिटी फांऊडेशन वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तसेच पुढील माहिती ही अर्ज केल्यानंतरचे मिळेल.

सोनू सूदने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केली असून त्यात त्याने लिहिले आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेला वाढवण्यासाठी आपल्याला उज्जवल सीएची (CA) गरज आहे. यासाठी आम्ही एक पाऊल उचलत आहोत. सोनूने आपल्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेर केली आहे. सोनू सूदने पुन्हा एकदा एक पाऊल शिक्षणाकडे वळवले आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण अर्ज करू शकता.

Home

Sonu Sood will free education of Chartered Accountants
सोनू सूद

सोनू सूदच्या कार्यामुळे देशात त्याचे करोडो चाहते आहेत. याआधी सुद्धा सोनूने यूपीएससी सारख्या परीक्षा देणाऱ्या तसेच आईएएस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी विनामुल्य कोचिंग सुरू केले आहे. कोरोना काळात लोकांच्या मदतीला सोनू सूद पुढे आला होता. लॉकडाउनमुळे लोक पायी आपल्या गावी जात होते. त्यावेळेस सर्व लोकांना सुखरूप त्यांच्या गावी पोहचवण्याचे काम सोनू सूदने केले आहे. देशातील प्रत्येक राज्यात  ऑक्सीजन प्लांट लावण्यापासून ते मेडिकल सुविधा उपलब्ध करुन देण्यापर्यंत सोनूने अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत (Gold has saved many lives).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी