33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाअंधश्रद्धेचा विळखा आता भारतीय फुटबॉलला सुद्धा! चक्क ज्योतिषाकडून संघाची निवड..

अंधश्रद्धेचा विळखा आता भारतीय फुटबॉलला सुद्धा! चक्क ज्योतिषाकडून संघाची निवड..

खेळ, खेळाडू आणि खेळाडूंच्या अंधश्रद्धा हे समिकरण काही नवीन नाही. भारतातील आणि भारताबाहेरील वेगवेगळ्या खेळांतील काही दिग्गज खेळाडू हे त्यांच्या खेळाबरोबरच त्यांनी पाळलेल्या अंधश्रद्धांमूळे नेहमीच चर्चेत असतात. भारताचा महान क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर असो की टेनिस सम्राज्ञी सेरेना विलियम्स! बास्केटबॉलचा बादशाह माइकल जॉर्डन असो की फुटबॉल स्टार ख्रिस्तीयानो रोनाल्डो! हे त्यांच्या खेळातील कामगिरीसोबतच त्यांनी पाळलेल्या काही अंधश्रद्धांबाबतीतही चर्चेत असायचे. पण आता भारतीय फुटबॉल संघातून एक धक्कादायक गोष्ट बाहेर पडली आहे. त्यामुळे, भारतीय फुटबॉल चाहते चांगलेच संतापले आहेत.

इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सामन्याआधी संघनिवड करण्यासाठी चक्क ज्योतिषिंची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 11 जून 2022 रोजी कोलकाता येथे होणाऱ्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या पात्रता फेरीच्या सामन्याआधी हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. दिल्ली येथील ज्योतिष भूपेश शर्मा यांनी मेसेजद्वारे संघात खेळवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी इगोर स्टिमॅच यांना पाठवली होती. ज्योतिष भूपेश शर्मा आणि इगोर स्टिमॅच यांच्यात मे ते जून 2022 दरम्यान जवळपास 100 मेसेजेसची देवाणघेवाण झाली होती. ज्यात, भारतीय खेळाडूंच्या संघातील सहभागाबद्दल चर्चा झाली होती.

या यादीत सामन्यासाठीच्या संभाव्य 11 खेळाडूंची नावे होती. ज्योतिषांनी प्रत्येक खेळाडूच्या नावापुढे त्याला खेळवायचे की नाही हे लिहून पाठवले होते. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार स्टिमॅच यांनी संघात बदल करत सामन्यापूर्वी भारताचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दोन प्रमुख खेळाडूंची नावे नव्हती. त्या खेळाडूंसाठी ताऱ्यांची स्थिती फारशी चांगली नसल्याचे ज्योतिषांकडून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा 

IND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक वेगाने 13 हजार धावांचा विक्रम

खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

पाकिस्तानी तरुणी म्हणाली ‘त्याच्या’ ऐवजी विराट कोहलीची निवड करेन

त्यामुळे आता भारतीय संघात यापुढे ज्योतिष खेळाडू निवडणार का खेळाडूंच्या गुणवत्तेनुसार त्यांना संधी दिली जाणार? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी