28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमनोरंजनपंतप्रधान मोदीचं रणवीर-दीपिकाकडून कौतुक!

पंतप्रधान मोदीचं रणवीर-दीपिकाकडून कौतुक!

गेल्या आठवड्यात भारतात जी-२० कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जी-२० कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानं अभिनेता रणबीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पाडूकोननं प्रशंसा केली आहे. दोन्ही नवरा-बायकोनं इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत जी-२० हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.
सध्या रणवीर सिंग भलताच खुश आहे. ‘८३’, ‘जयेश भाई जोरदार’, ‘सर्कस’ हे लागन तीन सिनेमे दणाणून आपटले. रणबीर सिंगनं इंडस्ट्रीतून गाशा गुंडाळावा अशी चर्चा सुरु असतानाच त्यानं ‘रॉकी और रानी’ हा हिट चित्रपट दिला. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भटदेखील होती. ‘रॉकी और रानी’चित्रपटामुळे रणवीरचं करियर पुन्हा बहरलं. दुसरीकडे, रणवीरची पत्नी दीपिका पाडूकोननं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. यंदाच्या वर्षांत दीपिका आणि शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं ४५० कोटी रुपयांची कमाई केली. नुकताच दहीहंडीला शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकाची पाहुण्या कलाकाराची भूमिका भाव खाऊन गेली.

या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर प्रशंसा केल्यानं नवी चर्चा सुरु झालीये. एरव्ही नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीस्तमनात अभिनेता अक्षय कुमार केवळ चर्चेत असतो. अक्षयनं अगोदरच ‘एक्स’ या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. जी-२० कार्यक्रमाचं भारतानं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट रिट्विट करत अक्षयनं सवयीप्रमाणे मोदींचं कौतुक केलं. काही तासांनी अभिनेता रणवीर सिंगनं इंस्टाग्रामवर मोदींची स्तुती केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. “आपल्या उज्वल भविष्यासाठी सर्व राष्ट्रांना एकत्रित आणून ‘जी२०’ कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आपलं अभिनंदन. आपली पृथ्वी आपला परिवार आणि भविष्य आहे” या शब्दात रणवीर सिंगनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्राम स्टोरीवर कौतुक केलं.
हे ही वाचा 
मंगळवारी सकाळी दीपिका पाडूकोणनंही इंस्टाग्राम स्टोरीवर मोदी यांची स्तुतीस्तमने गायली. जी२०च्या यशस्वी आयोजनामुळे इतर राष्ट्राना भारताची कार्यक्षमता दिसली. आपली पृथ्वी आपला परिवार आणि भविष्य आहे, असं दीपिकानं पोस्ट केलं. दोन्ही नवरा बायको राजकीय भाष्य करण्यापासून अलिप्त राहतात. दोघांनीही समाजातील घातक प्रवृत्तीबद्दलही सोशल मीडियावर कधी चर्चा केली नाही. मोदींच्या गुड बुक्समध्ये राहण्यासाठी दीपिका आणि रणबीरनं हा प्रकार केल्याची चर्चा सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी