31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमहाराष्ट्रIND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक...

IND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक वेगाने 13 हजार धावांचा विक्रम

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीने आज विराट विक्रम केला. श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडीयममध्ये एशिया कप 2023 मधील सुपर 4 सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळताना कोहलीने एकदिवसीय सामन्यातील आपले 47 वे शतक पूर्ण केले. विराट कोहलीने वन डे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक जलद 13,000 धावांचा विक्रम करत इतिहास रचला.

टीम इंडियाचा सुपरफास्ट खेळाडू म्हणून कोहलीचे नाव घेतले जाते. या आधी आठ हजार, नऊ हजार, 10 हजार 11 हजार, 12 हजार धावा सर्वाधिक जलद गतीने पूर्ण करणारा खेळाडू देखील विराट कोहलीचेच रॅकॉर्ड आहे. आता विराट कोहलीने सचिन तेंडूलकर (18,426), कुमार संगकारा (14,234), रिकी पाँटिंग (13,704) आणि सनथ जयसूर्या (13,430) यांच्याच्या बरोबर वन डे क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नाव कोरले आहे.

सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला

विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा सर्वात जलद 13 हजार क्लबमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम मोडीत काढला. त्याच बरोबर रिकी पॉन्टिंग (३४१), संगकारा (३६३) आणि जयसूर्या (४१६) यांच्या पुढे सचिनने ३२१ डावांमध्ये हा ऐतिहासिक कामगिरी केली होती. विराट कोहलीने पाकिस्तान विरोधात आज उत्कृष्ट खेळी केली. 94 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांसह कोहलीने नाबाद 122 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा 
‘बार्टी’च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त
जवानचा सिक्वेल येणार… ‘या’ अभिनेत्याने दिली माहिती
मनसेचे आमदार राजू पाटील संतापले, नावापुढे डॉक्टर लावणाऱ्या आयुक्त, खासदारांना लोकांची नस सापडली नाही!

कोहली आता सचिन तेंडुलकरच्या मागे सर्वाधिक एकदिवसीय शतकांसह फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तेंडूलकरची या फॉरमॅटमध्ये 49 आहेत. कोहलीने केएल राहुलसोबत नाबाद 233 धावांची भागीदारी केली, राहूलने देखील आपले 6 वे वनडे शतक ठोकले आणि 106 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 111 धावा केल्या.

सलामीवीर रोहित शर्मा (५६) आणि शुभमन गिल (५८) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांमुळे कोहली आणि राहुलची धमाकेदार खेळी झाली. एकदिवसीय डावात भारतीय अव्वल चार खेळाडूंनी ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही चौथी वेळ आहे.

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय शीर्ष फळीतील उत्कृष्ट फलंदाजीमुळे संघाला राखीव दिवशी 50 षटकांत 2 बाद 356 धावा करता आल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी