28 C
Mumbai
Tuesday, December 5, 2023
घरक्रीडाकुस्ती एक, स्पर्धांची शहरे दोन

कुस्ती एक, स्पर्धांची शहरे दोन

महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती या खेळाचे तरूणांना भयाण वेड आहे. कुस्ती खेळता येत नसली तरीही गावगडी कुस्त्यांच्या फडात कुस्ती पाहत आनंद लुटत असतात. वर्षभर मेहनत करून कुस्तीचा फड गाजवणाऱ्या पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत कसोटी असते. या स्पर्धेकडे राज्यातील चाहत्यांचे लक्ष लागले असून या स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन हे दोन शहरात होणार आहे. सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापुर या पश्चिम महाराष्ट्रातील भागात कुस्तीला अधिकच महत्व आहे. दरम्यान, यंदा होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन हे धाराशिव आणि पुणे येथे होणार आहे. यासाठी आकर्षक बक्षीसांची खैरात असून महाराष्ट्र केसरी कोण होणार? हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.

पुण्याच्या फुलगाव येथे पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी राज्यातून सहा महानगरपालिका, ३६ जिल्ह्यातून स्पर्धक(पैलवान) येणार आहेत. असे ४२ संघ स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन प्रकारात कुस्ती खेळवता येणार आहे. पहिल्या प्रकारात मातीतील कुस्तीला प्रधान्य दिले जाईल. तर दुसऱ्या प्रकारातील कुस्तीचा खेळ हा मॅटवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी ८४० मल्ल येणार आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

हे ही वाचा

तुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?

श्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?

दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही ७ ते १० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहणार आहेत. कुस्तीगीर संघटनेच्या वादामुळे दोन्ही ठिकाणी मल्लांना कुस्तीसाठी संधी दिली जाणार आहे.तर यासाठी महिंद्रा थार, ट्रॅक्टरसह इतर बक्षीस देण्यात येणार आहेत. तर दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही धाराशिव येथे होणार आहे.

दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिव येथे

धाराशिवमध्ये ता.१६ ते २० या दिवसांत महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यासाठी स्कॉर्पिओ आणि १ लाख, बुलेट असे बक्षिस असणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मागोवा पाहिल्यास शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. तर यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जसजशी जवळ येईल तशी स्पर्धेला रंगत निर्माण होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी