27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमनोरंजनतुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?

तुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?

परफेक्शनिस्ट आमिर खानची लाडकी कन्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या महिन्यात आयरा खानचा नुपूर शिखरे याच्याशी साखरपुडा झाला. आता आमिर खानची मुलगा म्हणजे चर्चा तर होणारच ना! आणि आताची ताजी बातमी म्हणजे तर आयरा खानचं केळवणदेखील झालं आहे. आमिर खानचा जावई पक्का मराठमोळा आहे. आयरा आणि नुपूर खूप आधीपासून प्रेमात होते. अखेर दोघांनी ठरवलं की, लग्नाच्या बेडीत अडकायचं! मग काय विचारला नुपूर शिखरने आयरा खानला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं आणि साखरपुड्याची अंगठी घातली. आणि दोघेही खऱ्या अर्थाने ‘एन्गेज’ झाले. त्यापुढील पाऊल दोन्ही कुटुंबीयांनी उचललं आहे. आयराला खास केळवणासाठी बोलावलं होतं.

मराठमोळा नवरा म्हणजे मराठी बोलायला हवं ना! मग काय विचारता नुपूर घास भरवताना तिनं खास मराठीत नुपूरला छानसं ऐकवलं. त्यावर नुपूर आणि त्याचं कुटुंबीयदेखील खूश झाले आणि त्यांनीही आनंद व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

आयरा खान आणन नुपूर शिखरे यांच्यात कधी सूत जुळले आणि ते प्रेमात पडले हे त्यांनाही कळले नाही. खरं तर तीन वर्षांपासून म्हणजे २०२० पासून आयरा खान आणि नुपूर शिखरे एकमेकांना डेट करत आहेत. आता तुम्हाला उत्सुकता असेल आमिर खानचा जावई नुपूर शिखरे आहे तरी कोण याची!

तर नुपूर हा सेलिब्रिटी जीम ट्रेनर आहे. सुष्मिता सेनचा ट्रेनर म्हणून आधिक चांगला ओळखला जातो. नुपूर अतिशय उत्तम डान्सर आहे. आणि कुणालाही फारशी माहीत नसलेली त्याच्या बाबतची गोष्ट म्हणजे तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. आयरा खानला फिटनेसचं प्रशिक्षण देता देता तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांचे फोटो आणि व व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करत असते.

हे ही वाचा

श्रमेश बेटकरच्या रक्तरंजित पत्रावर हेमांगी कवी काय म्हणाली?

दिशा पटाणीला नक्की काय सांगायचं आहे?

शिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

केळवणाच्या निमित्ताने नुपूरच्या घरी छानसा मऱ्हाटमोळा कार्यक्रम झाला. त्याचे फोटो पिंकव्हिलावर शेअर करण्यात आलेत. नुपूर शिखरेचा जन्म पुण्यातील म्हणजे १७ ऑक्टोबर १९८५ रोजीचा. पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं मुंबईच्या पोद्दार कॉलेजमधून पदवी घेतली. तर नुपूरची आई प्रीतम या नृत्य शिक्षिका आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी