32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रासायनिक कारखाने झाले जीवघेणे

रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रासायनिक कारखाने झाले जीवघेणे

महाडमधील ब्ल्यु हेल्थ केअर लिमिटेड या कंपनी झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगार ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेकडो रासायनिक कारखान्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य औद्योगिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी राज्य सरकारने औद्योगिक धोरण राबवले. औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात नागरी वस्ती नसावी, कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या सुविधा पुरवाव्यात, सांडपाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे. त्या त्या कंपन्यांची अग्निशमन व्यवस्था असावी असे नियम असताना रायगड, ठाणे, पालघरसह पिंपरी-चिंचवडसह राज्यातील कंपनी व्यवस्थापनांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे एखादी घटना झाल्यावर त्याची बातमी होते, हळहळ होते, त्यापलीकडे काहीच होत नाही.

अंतराळ आणि संरक्षण, वाहने, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, अन्न प्रक्रिया, रत्ने व आभूषणे, माहिती तंत्रज्ञान, चामडे व पादत्राणे, तेल व वायू, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, खेळणी आदींचे छोटे मोठे कारखाने आहेत. राज्यामध्ये अंबरनाथ, बदलापूर, बुटीबोरी, डोंबिवली, कल्याण-भिवंडी, कुरकुंभ, लोटे परशुराम, महाड, पाताळगंगा, रोहा, तळोजा, तारापूर, आणि टीटीसी अशी १३ रासायनिक क्षेत्रे आहेत. यात लाखो कामगार काम करत असतात. त्याची नोंद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडे (एमआयडीसी) असते.

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत 10 जून 2023 रोजी स्फोट झाला आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, चार कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात वायु गळती झाल्यामुळे स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत.

चार वर्षापूर्वी धुळे येथील एका कंपनीमध्ये स्फोट होऊन आठ जण ठार झाले तर 15 कामगार जखमी झाले होते. पालघरमध्ये 26 ऑक्टोबर2022 रोजी केमिकल कंपनीत स्फोट होऊन 3 जणांचा मृत्यू तर 10 पेक्षा जास्त जण जखमी होते. जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत 1 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी स्टील वितळणाऱ्या भट्टीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, भट्टी उडून गेली.

या अपघातात आठ ते दहा मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या आणि अशा अनेक घटना वर्ष दोन वर्षात राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील रासायनिक आणि अन्य कारखाने सुरक्षित नाहीत, ही बाब लपून राहत नाही.

हे सुद्धा वाचा 

तुम्ही आयरा खानचं केळवण पाहिलं का?
तृतीयपंथियांचे आरक्षण उपोषण मागे
दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

   सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष
कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या सुविधा पुरवाव्यात, सांडपाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे. त्या त्या कंपन्यांची अग्निशमन व्यवस्था असावी असे नियम असताना रायगड, ठाणे, पालघरसह पिंपरी-चिंचवड आदी भागातील कंपनी व्यवस्थापनांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. महाड येथील दुर्घटनेची चौकशी केली जाईल. दोषी असणाऱ्यांवर करवाई केली जाईल. पण अशा कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा जीव अजूनही असुरक्षित आहे त्याचे काय, याचे काही उत्तर मिळत नाही.

महाड कंपनी स्फोटात सहा कामगार ठार
महाड एमआयडीसीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली होती. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सात कामगार बेपत्ता आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची नव्याने उभारणी सुरु होती. या ठिकाणी असलेला अंजनी बायोटेक हा प्रकल्प दोन वर्षांपासून बंद होता.

या ठिकाणी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीची उभारणी सुरु असताना एका रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर आणखी काही रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला आणि आग सर्वत्र पसरली. या आगीत सुरुवातील ११ जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आगीत सात जण जखमी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी