31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याने दिले रोहित शर्मा बाबत मोठे विधान 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार होताच हार्दिक पांड्याने दिले रोहित शर्मा बाबत मोठे विधान 

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये खूप काही मोठे बदल झाले आहे. या हंगामातील सर्वात मोठा बदल म्हणजे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians Captain) कर्णधार आता रोहित शर्मा नसून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे. या मोठ्या बदलामुळे आयपीएल आणि मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत आहे. तसेच आता हार्दिक पांड्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत असे विधान दिले, ज्यामुळे आता नवीन चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये खूप काही मोठे बदल झाले आहे. या हंगामातील सर्वात मोठा बदल म्हणजे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians Captain) कर्णधार आता रोहित शर्मा नसून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे. या मोठ्या बदलामुळे आयपीएल आणि मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत आहे. तसेच आता हार्दिक पांड्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत असे विधान दिले, ज्यामुळे आता नवीन चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

तुम्हाला सांगू इच्छिते की, हार्दिक पांड्याने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आपला प्रवास सुरू केला. हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता आणि त्यानंतर त्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले.हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद जिंकले तर 2023 मध्ये गुजरात टायटन्स उपविजेते ठरले.

आयपीएल 2024च्या आधी केकेआरच्या कॅम्पमध्ये सामील झाला ‘हा’ सर्वात महागडा खेळाडू, पहा आहे तरी कोण?

अलीकडे हार्दिक पांड्या आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी आयपीएल 2024 पूर्वी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यादरम्यान दोघांनीही रोहित बाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा हार्दिक पांड्याला विचारण्यात आले की, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्यांच रोहित सोबत बोलणं झाले आहे का, यावर हार्दिक ने जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

हार्दिक पांड्याला विचारण्यात आले की, ‘मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर तू रोहित शर्माशी बोललास का?’ पंड्याने उत्तर दिले, ‘हो आणि नाही… तो सतत प्रवास करत होता.’ जेव्हा हार्दिकला रोहितच्या जागी कर्णधार बनवण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे, जो मला मदत करेल. या संघाने जे काही साध्य केले आहे ते रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवले आहे, मी फक्त हा प्रवास पुढे नेणार आहे, मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली खेळली आहे, मला माहित आहे की त्याचा नेहमीच माझ्या खांद्यावर हात असेल.’

WPL 2024 चे विजेतेपद जिंकताच किंग कोहलीचा स्मृती मानधनाला व्हिडीओ कॉल; नेमकं काय म्हणाला विराट?

जेव्हा मार्क बाउचरला विचारण्यात आले की कर्णधारपदाचे दडपण दूर झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करेल का? यावर मार्क म्हणाला, ‘मी नुकतेच त्याला इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना पाहिले, तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता. रोहितवर कर्णधारपदाचे दडपण राहणार नाही आणि त्यामुळे त्याला अधिक मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि त्याने हे केले तर मुंबई इंडियन्स संघ खूप पुढे जाऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी