28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली; CM शिंदे हे काय बोलून गेले?

आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली; CM शिंदे हे काय बोलून गेले?

राज्यात लोकसभा निवडणुकीची (lok sabha election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीनं 45 आकडा पार करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाहीय. भाजपने (BJP) महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. (Cm Eknath Shinde Press conference big statement We are dealer rahul gandhi uddhav thackeray )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद बोलावली. यावेळी, शंभुराज देसाई आणि उदय सामंत उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच, विरोधकांवर सडकून टीका केली. सर्व डीलर असल्याची टीका शिंदे गटावर विरोधकांकडून केली जाते. यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

निवडणुक आयोगाचा दणका; BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल सह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

महाराष्ट्रामध्ये महायुती 45 चा आकडा पार करणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासह देशात विरोधकांकडे आत्मविश्वास नाहीय. आम्ही पंतप्रधानांचे हात मजबूत करु, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आता आचारसंहिता सुरु झालीय. सरकारने जी काम केली त्यांचे लोकार्पण केले, या कामात आम्ही व्यस्त होतो.

महायुतीने केलेले काम आपल्यासमोर आले. शेतकरी, कामगार, महिला,उद्योग या सर्वात महाराष्ट्राने आघाडी घेतली. मेट्रो, अटल सेतू अशी अनेक कामे झाली तर अनेक प्रगतीपथावर आहेत. राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल. लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.

माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा; शरद पवारांसमोर मोठा पेच

हो, आम्ही खरच डीलर….

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हो, आम्ही खरच डीलर आहोत…आम्ही डील केली शेतकरी, महिलांना न्याय देण्यासाठी डील केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधींच्या सभेवरुन ठाकरेंवर हल्लाबोल

देशभरातील निराश झालेले लोक राहुल गांधींच्या सभेत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर ही सभा झाली हा काळा दिवस आहे. हिंदुत्व विचारधारेविरुद्ध बोलणाऱ्यांसोबत ठाकरे बसले.

‘माझ्या तमाम हिंदु बांधवांनो’ हा शब्द गायब झाला. बाळासाहेबांचे धोरण, विचार सोडला म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले. त्यांना बोलायला 5 मिनिट दिली त्यावरुन त्यांची पत कळाली, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 50 वर्षात जे झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं. देशाती अर्थव्यवस्था 11 वरुन 5 वर आणली. आता 3 वर आणायची आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा SBI ला झापलं; लपवाछपवी नको, तीन दिवसांत सगळे तपशील द्या

विश्वास गमावलेला विरोधी पक्ष म्हणजे इंडिया अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेष त्यांच्या भाषणातून दिसत होता. साडेतीन शक्ती पीठ, नारी शक्ती हे संपवणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी