28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाआयपीएल 2024च्या आधी केकेआरच्या कॅम्पमध्ये सामील झाला 'हा' सर्वात महागडा खेळाडू, पहा आहे...

आयपीएल 2024च्या आधी केकेआरच्या कॅम्पमध्ये सामील झाला ‘हा’ सर्वात महागडा खेळाडू, पहा आहे तरी कोण?

लवकरच आयपीएल 2024 ची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सर्वजण उत्सुक आहे. चाहत्यांबरोबर खेळाडू देखील या हंगामाची वाट पाहत आहेत. 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी आता परदेशातून देखील खेळाडू भारतात येत आहे. याच दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स ने आपल्या सोशल मीडिया वर इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ची फोटो शेयर केली आहे. हा खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. 

लवकरच आयपीएल 2024 (IPL 2024) ची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 17 (IPL 17) व्या हंगामासाठी सर्वजण उत्सुक आहे. चाहत्यांबरोबर खेळाडू देखील या हंगामाची वाट पाहत आहेत. 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी आता परदेशातून देखील खेळाडू भारतात येत आहे. याच दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आपल्या सोशल मीडिया वर इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूची फोटो शेयर केली आहे. हा खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc). 

केकेआर (KKR) ने लिलावात 24.75 कोटी रुपये खर्चून स्टार्कचा आपल्या संघात समावेश केला होता. कोलकाता नाइट रायडर्सने इंस्टाग्रामवर मिचेल स्टार्कचे (Mitchell Starc) काही फोटो शेअर केले आहे. तसेच केकेआरने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले ‘इट्स अ स्टारकी नाईट’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

तुम्हाला सांगते की, मिचेल स्टार्क (Mitchell Starc) तब्बल 8 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुन्हा झळकणार आहे. मिचेल स्टार्क आयपीएलच्या मात्र दोन हंगामात खेळताना दिसला होता. तो 2014 आणि 2015 मध्ये आरसीबी कडून खेळला होता. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये 20.38 च्या सरासरीने 34 विकेट घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 7.17 राहिला आहे.

WPL 2024 चे विजेतेपद जिंकताच किंग कोहलीचा स्मृती मानधनाला व्हिडीओ कॉल; नेमकं काय म्हणाला विराट?

मिचेल स्टार्कच्या पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, जर केकेआरची टीम आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली, तर या संघाला एकूण 17 सामने खेळावे लागतील. अशा परिस्थितीत स्टार्कला प्रत्येक सामन्यासाठी 1.46 कोटी रुपये मिळतील.

स्पेशालिस्ट गोलंदाज असल्याने मिचेल स्टार्कला प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा करू शकते. म्हणजेच त्याला एका ओव्हरसाठी 36 लाख रुपये आणि प्रत्येक बॉलसाठी 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट दिले जाईल.

‘मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल’, आर अश्विनचं विचित्र वक्तव्य

केकेआर आयपीएल 2024 –
नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी