31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाWPL 2024 चे विजेतेपद जिंकताच किंग कोहलीचा स्मृती मानधनाला व्हिडीओ कॉल; नेमकं...

WPL 2024 चे विजेतेपद जिंकताच किंग कोहलीचा स्मृती मानधनाला व्हिडीओ कॉल; नेमकं काय म्हणाला विराट?

रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore) यांच्यात महिला प्रीमियर लीग 2024 (Women's Premier League 2024) चा अंतिम सामना खेळण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चे विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्लीच्या 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद (RCB Beat DC) पटकावले. आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहली ने व्हिडिओ कॉल (Virat Kohli Video Call) करून स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि त्यांच्या संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयानंतर विराट कोहली खूप खुश दिसत होता.

रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore) यांच्यात महिला प्रीमियर लीग 2024 (Women’s Premier League 2024) चा अंतिम सामना खेळण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चे विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्लीच्या 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद (RCB Beat DC) पटकावले. आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहली ने व्हिडिओ कॉल (Virat Kohli Video Call) करून स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि त्यांच्या संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयानंतर विराट कोहली खूप खुश दिसत होता.

मात्र आता स्मृती मानधना (Smriti Mandhana) ने विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) सोबत झालेल्या व्हिडिओ कॉलवर बद्दल माहिती दिली आहे. आरसीबी (RCB) महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना यांनी व्हिडिओ कॉलवरील संभाषणाबद्दल सांगितले की, “आवाजामुळे मला विराट भैय्याचा आवाज ऐकू आला नाही. तो हसतमुखाने खूप आनंदी दिसत होता. तो गेल्या 16-17 वर्षांपासून फ्रेंचायझीसोबत काम करत आहे. ते याचा एक भाग आहे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळाला.”

‘मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल’, आर अश्विनचं विचित्र वक्तव्य

विराट कोहली (Virat Kohli) च्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये किंग कोहली डान्स करताना दिसत होता. आता स्मृतीने सांगितले की, “विराट कोहली या विजयाने खूप खूश आहे. आता पुरुष संघही आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.” विराट कोहली सोबत बोलताना स्मृती मानधना खूश दिसत होती. स्मृती चेहऱ्यावर स्मितहास्य करत बोलत होती तर दुसरीकडे चाहते स्टेडियममध्ये नाचत होते.

विराट कोहली गेल्या 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये आरसीबी पुरुष संघासाठी 16 हंगाम खेळले आहेत आणि यावेळी तो 17 व्या हंगामासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, आरसीबी पुरुष संघाने आजपर्यंत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. अशा परिस्थितीत आरसीबीच्या महिला संघाच्या विजयानंतर कोहलीला फार आनंद झाला.

‘तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही…’, मुंबईच्या खेळाडूंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली नेहमी म्हणतो की त्याला या संघासाठी ट्रॉफी जिंकायची आहेत. मात्र, हे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. दरम्यान, स्मृती मानधना यांच्या टीमने ट्रॉफी जिंकून विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण केले. स्मृती मानधनाच्या टीम सोबत बोलतांना तो हसत होता. त्याच्या चाहत्यांसाठीही हा दिवस मोठा आहे. अनेकदा इतर संघांचे चाहते सोशल मीडियावर बेंगळुरूची खिल्ली उडवतात कारण या संघात अनेक दिग्गज आहेत, मात्र आजपर्यंत एकही हंगाम जिंकता आलेला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी