33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजनएल्विश यादव आहे कोट्यवधींचा मालक, एका महिन्यात किती कमावतो?

एल्विश यादव आहे कोट्यवधींचा मालक, एका महिन्यात किती कमावतो?

बिग बॉस ओटीटी 2' विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एल्विश यादवला (Elvish Yadav) काल म्हणजेच 17 मार्चला नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती. इतकेच नव्हे तर त्याने या प्रकरणात सापांच्या विषाची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या या कबुली जबाबानंतर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एल्विश यादव सध्या ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. तर जाणून घेऊयात त्याच्या नेटवर्थबद्दल... (Elvish Yadav Net Worth luxry car collection and rs 14 crore house)

बिग बॉस ओटीटी 2′ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एल्विश यादवला (Elvish Yadav) काल म्हणजेच 17 मार्चला नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती. इतकेच नव्हे तर त्याने या प्रकरणात सापांच्या विषाची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या या कबुली जबाबानंतर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एल्विश यादव सध्या ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. तर जाणून घेऊयात त्याच्या नेटवर्थबद्दल… (Elvish Yadav Net Worth luxry car collection and rs 14 crore house)

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव (Elvish Yadav) हा एक फेमस यूट्यूबर आहे. शॉर्ट चित्रपटांची देखील एल्विश यादव हा निर्मिती करतो. एल्विश याचे एक चॅनल देखील आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसतो. गुरुग्राम जवळच्या वजीराबाद येथील रहिवाशी एल्विश यादव हा असून तो 26 वर्षांचा आहे. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये एल्विश यादव याने बीकॉम केले.

यूट्युबर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ; पोलिसांना दिली कबुली

नेटवर्थबद्दल…

एल्विश यादव (Elvish Yadav) याच्या घराची किंमत आज कोट्यवधीच्या आसपास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई एल्विश यादव हा करतो. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना एल्विश यादव हा दिसला.

एल्विशने वजिराबाद, गुडगाव येथे चार मजली आलिशान घर घेतले आहे. या घराची किंमत सुमारे 12 ते 14 कोटी रुपये आहे, असं म्हटलं जात आहे. हे घर 16 BHK आहे. याशिवाय दुबईमध्ये 8 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे.

एल्विश हा सुमारे 10-15 लाख रुपये दर महिन्याला कमावतो. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 40 कोटी रुपये आहे. एल्विश यादव एका व्हिडीओसाठी जवळपास 4 ते 6 लाख रुपये मानधन घेतो, असं म्हटलं जात आहे.

यूट्युबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

एल्विश यादव हा युट्यूबसोबतच इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर अकाऊंट्सवरुन कमाई करतो. त्यानं बिग बॉस OTT या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 15-20 लाख रुपये मानधन म्हणून घेतले. हा शो जिंकल्यानंतर त्याला 25 लाख रुपये मिळाले.

लग्झरी गाड्यांचे कलेक्शन

एल्विशकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे 1.41 कोटी रुपयांची पोर्श 718 बॉक्सस्टर कार आहे. याशिवाय त्याच्याकडे ह्युंदाई वेर्ना आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या इतर लग्झरी गाड्या देखील आहेत. ही सर्व संपत्ती त्याने यूट्यूबवरून कमावली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी