30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाWomen’s Asia Cup 2022: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा भारतावर ऐतिहासिक विजय; आशिया...

Women’s Asia Cup 2022: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा भारतावर ऐतिहासिक विजय; आशिया कप स्पर्धेत १३ धावांनी केला पराभव

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ १९.४ षटकांत १२४ धावांवर गडगडला.

थायलंडच्या संघाविरूद्ध गुरूवारी सुमार कामगिरी करुन लाजीरवाना पराभव स्विकारलेल्या पाकिस्तान महिला संघाने आज मात्र भारताचा पराभव केला. आज महिला आशिया चषकातील तेराव्या सामन्यात सामन्यात पाकिस्ताने निदा दारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताचा १३ धावांनी पराभव केला. पाकिस्तान महिला संघाला सहा वर्षांना टीम इंडियाला पराभूत करण्यात यश मिळालं आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ १९.४ षटकांत १२४ धावांवर गडगडला.

महिला आशिया चषकाच्या ऐतिहासात भारत आणि पाकिस्तान १२ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील भारतानं ११ सामने जिंकले आहेत. तर, पाकिस्ताने आज पहिल्या विजयाची नोंद केली आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानची भारतविरुद्धची कामगिरी अतिशय खराब आहे. परंतु, कर्णधार बिस्माह मारूफच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली.

भारतासमोर १३८ धावांचे लक्ष्य –

या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं २० षटकात ६ विकेट्स गमावून भारतासमोर १३८ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक तीन विकेट्स तर, पूजा वस्त्राकरनं दोन विकेट्स घेतल्या. भारताकडून ऋषा घोषनं सर्वाधिक २६ धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त भारताच्या एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून नसरा संधूने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स पडली.

हे सुद्धा वाचा —

Eknath Shinde: एसटीचे ‘ते’ ११७ कर्मचारी ‘पुन्हा येणार’; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Bullet Train : पंतप्रधानांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन 2026साली धावणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

आशिया कप २०२२ मध्ये एका अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये देखील सुमार कामगिरी केली. ऋचा घोष सोडल्यास कोणीही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. ऋचाने १३ चेंडूत एक चौकार आणि ३ सिक्सर मारत २६ रन काढल्या, मात्र ती बाद झाल्यानंतर भारतीय संघ विजयापासून १३ रन दूरच राहिला.

 ऋचा संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही –

भारतीय संघ फलंदाजी करताना स्मृती मंधानाने चांगली सुरूवात केली, मात्र २३ धावांवर पहिली विकेट गेल्यानंतर भारतीय संघ डळमळला. भारतीय संघाचा स्कोर ६५ धावांमध्ये ५ विकेट अशा वाईट परिस्थीतीत आला. मेघना १५, मंधाना १७, जेमिना २, पूजा वस्त्रकार ५ आणि हेमलताने २० धावा काढल्या, पूजाचे रन आऊट होणे संघाला महागात पडले. दीप्ती शर्मा १६ आणि हरमनप्रीत कौर १२ धावांवर बाद झाल्या. तर फिल्डींगकरताना दुखापत झालेली ऋचाने शेवटी उत्कृष्ट फलंदाजी केली मात्र ती संघाला विजयाच्या शिखरावर नेऊ शकली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी