33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : 'ही' भारतीय कंपनी करणार टी20 विश्वचषकातील संघाला स्पॉन्सरशीप

T20 World Cup : ‘ही’ भारतीय कंपनी करणार टी20 विश्वचषकातील संघाला स्पॉन्सरशीप

टी20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून या स्पर्धेत एकुण 16 संघ सहभागी होतील. यावेळी या 16 संघांमध्ये मिळून 45 सामने होणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय कंपनीचा बोलबाला असणार आहे.

आशिया चषक संपल्यानंतर आता संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींना टी20 विश्वचषकाची ओढ लागली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून या स्पर्धेत एकुण 16 संघ सहभागी होतील. यावेळी या 16 संघांमध्ये मिळून 45 सामने होणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय कंपनीचा बोलबाला असणार आहे. यासाठी भारतीय कंपनी अमूलने टी20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या आयर्लंड संघाचे प्रायोजकत्व घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. अनेकदा अमूल कंपनी नावलौकिक मिळवण्यासाठी जाहिरात करण्यात अग्रगन्य असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदा त्यांनी जाहिरातीसाठी थेट आयसीसी टी20 विश्वचषकाचे व्यासपीठ निवडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अमूलने आयर्लंड क्रिकेट बोर्डाशी करार केला आहे. अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे आता टी20 विश्वचषकात आयर्लंडच्या जर्सीवर एका भारतीय कंपनीचे नाव दिसणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मूळ भारतीय असलेली अमूल ही जगातील नवव्या क्रमांकावरील सर्वात मोठी कंपनी आहे. शिवाय ती भारतातील सर्वात मोठी खाद्य पदार्थ निर्माण करणारी कंपनी आहे. याआधीही अमूलने आयसीसी स्पर्धांमध्ये संघांचे प्रायोजकत्व भुषवले आहे. 2019साली झालेल्या विश्वचषकात अमूलने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रायोजकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघालाही वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच एका नवख्या क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व घेतल्याने पुन्हा एकदा अमूल कंपनी चर्चेचा विषय बनत आहे.

हे सुद्धा वाचा

IND VS AUS : 200 पार करूनही भारताच्या हातात पराभवाचा नारळ

India-Australia T-20 series: भारत आणि ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी मोहालीमध्ये भिडणार

India’s Loss to Australia: ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही’ – रोहित शर्मा

दरम्यान, टी20 विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड संघ अ गटात सामील आहे. या गटात त्यांची लढत वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि स्कॉटलँडसोबत होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी आयर्लंडचा पहिला सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या गटातील या 4 संघांमधून केवळ 2 संघ विश्वचषकाच्या पहिल्या ग्रुपमध्ये सहभागी होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी